web-ads-yml-728x90

Breaking News

धुतुम च्या आधुनिक सरपंच रेश्मा ठाकुर यांचा आपले गाव आपली सुरक्षा उपक्रमाची महाराष्ट्रात चर्चा

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव उरण

धुतुम ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. रेश्मा शरद ठाकूर 2017 च्या निवडणुकीत जनतेतून सरपंच म्हणून निवडून आल्या सोबत आपल्या 9 पैकी 5 सदस्य आपल्या पॅनल चे येऊन बहुमत निर्माण केले यातच आपले पती शरद ठाकूर हे देखील सदस्य म्हणून निवडून आले, आपले गाव हे आदर्श गाव झाले पाहिजे या उद्दशानेच गावच्या सर्वांगीण विकासासाठी त्या झपाटलेल्या आहेत. गावचा विकास कसा करायचा हे जित जगत उदाहरण म्हणजे धुतुम ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ रेश्मा शरद ठाकूर यांचे उदाहरण देता येईल. गावचा चौफेर विकास करताना त्यांनी गावातील रस्ते, गटारे, यापासून शालेय शिक्षण, महिलांना स्वावलंबी बनविण्यापासून येथील उद्योगात आपली मुले कशी कामाला व व्यवसायात यशस्वी होतील त्यासाठी सरपंच सौ रेश्मा शरद ठाकूर यांनी प्रयत्न केले आहे. सरपंच रेश्मा ठाकूर यांनी पहिल्या प्रथम "आपलं गाव,आपली सुरक्षा " या संकल्पने प्रमाणे संपूर्ण गावाची सुरक्षा व निगराणी ही सी.सी.टीव्ही कॅमेऱ्या * च्या नियंत्रणात आणली. गावात 64 ठिकठिकाणी सी.सी. टिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत व गावत येणाऱ्या फेरीवाल्याला ग्रामपंचायत मध्येच दिवसा 10.00 ते 5.00 या वेळेत विजीट पास दिला जातो, तर भाडोत्रीस ओळख कार्ड देऊन त्याची नोंद ग्रामपंचायत मध्ये केली जाते. 

धुतूम ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ . रेश्मा ठाकूर यांनी आपल्या गावच्या अतिप्रसंगात सापडलेल्या व्यक्तिला आपला एक हात मदतीचा दान स्वरुपात पुढे करुया! ही संकल्पना आपल्या ग्रामस्थ साठी राबऊन एका *दानपेटी ची स्थापना केली असून त्याचा फायदा नागरिकांना झाला आहे. ही कल्पना एकमेकास प्रसंगात मदतीची आशा निर्माण करते. नेसर्गिक ऑक्सिजन उपक्रम . वृक्षवल्ली आम्हा सगे सोयरी वनचरे या उक्ती प्रमाणे गेले सतत चार वर्ष झाडे लावून त्यांचे संगोपन आपल्या मुलांप्रमाणे केले जात आहे , कीटकनाशक फवारणी करणे , पाणी शिंपने , ड्रॉपेज ने पाणी पुरवठा अशा योजना आखून झाडांची जोपासना केले गेली आहे. तर नागरिकांना फळ झाडे वाटप करण्यात आली आहेत. सरपंच रेश्मा ठाकूर यांच्या प्रयत्नातून ग्रामपंचायत मार्फत १५ % समाजकल्याण अंतर्गत जवळपास 200 प्रशिशित महिलांना शिवण यंत्र ( शिलाई मशीन ) यांचा वाटप करण्यात आले, असून प्रशिक्षित महिलांना प्लास्टिक बंदी अंतर्गत 7000 कापडी पिशवी शिवण्याचे काम त्याच महिलांना देल गेलं. तर महिला साठी हळदीकुंकू कार्यक्रमातून ठेऊन महिला भगिनित प्रेमाची भावना कशी निर्माण होईल असा स्वच्छ उद्देशातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. धुतूम ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ . रेश्मा ठाकूर यांनी आरोग्य धनसंपदा या तत्त्वाचे पालन करून " मच्छर मुक्त धुतूम गाव " अभियान राबविण्यात आले. बरेच दिवस मच्छर मुले नागरिक हैराण झाले होते , त्या पासून ठोस उपाय म्हणून टेंडर पद्धतीने एक वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट दिला आहे .

 प्रत्येक महिन्यात पहिल्या दिवशी स्प्रेईंग पंप लाऊन कीटक नाशक औषद फवावरणी * , या मध्ये संपूर्ण गावातील गटार आणि सौच खडे , टॉयलेट या ठिकाणी फवारणी करण्यात येत असून दुसऱ्या दिवशी तीन फोगिग मशीन लाऊन एकच वेली संपूर्ण गावात धुराळणी करण्यात येत आहे . अशा प्रकारे हे काम महिन्यातून एक वेळ असे नित्य नियमात काम चालू आहे. गावातील नागरिक या अभियानाचा स्वागत केले असून आनंद व्यक्त करत आहेत. गावात महाराष्ट्र शासन तर्फे ग्रामीण जीवोन्नती अभियान अंतर्गत धुतूम महिला सक्षमीकरण कार्यक्रम अभियान सुरू केले होते. रायगड हिरकणी महिला ग्रुप गावामध्ये १५ दिवसासाठी दाखल झाल्या होत्या , सदर महिला भगिनीनी गावातील घरो घरी जाऊन माहीती ची देवाणघेवाण केली . या अभियानात त्यांनी १० महिलांचा एक गट असे १८ स्वयम् सहिता गट निर्माण केले , तर २ सीआरपी ची नेमणूक केली . या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानावरून बोलताना सरपंच सौ रेश्मा ठाकूर यांनी सांगितले , कार्यक्रमासाठी महिला भगिनी यांनी मोठी उपस्थिती लावली होती . या अभियानातून आमच्या गावच्या महिला बचतीचे आणि स्वयम् रोजगाराचे धडे घेऊन नक्कीच स्वयंपूर्ण होतील अशी आशा व्यक्त केली. तर किशोर वयीन मुली यांना माशिक पाळी बद्दल माहीत या साठी "रेड डॉट" सामजिक संस्थे तर्फे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कोरोना साथीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आपल्या गावात होऊ नये म्हणून सर्वतोपरी प्रयत्न केले, कोरोना निर्मूलनाची उपाय योजनेसाठी ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि शासनाच्या नियमनुसार दहा दिवस गाव लोकडाऊन केला , या दरम्यान शासनातर्फे जनजागृती अभियान सुरू झाले श्री एन के म्हात्रे साहेब यांनी गावात ठीक ठिकाणी साऊंड माईक हातात घेऊन सोशल दिस्टांस , मास्क , वेळोवेळी हात धुणे , कोरोनाला न घाबरता सतर्क रहावे असे आवाहन केले . यावेळी सरपंच सौ. रेश्माताई यांच्या प्रयत्नातून कोरोना निर्मूलन संदर्भात माहिती व जनजागृती अभियान आणि * मालेगाव पॅटर्न काढा याचे प्रात्यक्षिक करून दाखविन्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक संतोष पवार साहेब व प्राध्यापक मढवी सर आणि सामजिक कार्यकर्ते श्री प्रमोदभाई ठाकुर यांनी गावात ठीक ठिकाणी जनजागृती मार्गदर्शन केले . या दरम्यान गावातील १० चे १० पेशंट सुखरूप घरी परतले व नवीन पेशंट सापडले नाही , या सर्व पेशंट ची विचारपूस व त्यांना काय मदतीची गरज भासत असल्यास सर्वतोपरी मदत सरपंच सै रेश्मा ठाकूर व त्यांचे सहकारी यांनी केली. त्यांना वेळोवेळी फोन करून मानसिक आधार दिला, तसेच नागरिकांनी केलेली मदत म्हणजे, जरी अत्यावश्यक सेवा देण्यासाठी घरा बाहेर गेले असतील तरी शासनाच्या नियमांचे पालन केले, मा.मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी कोविड १९ या महामारीत केलेल्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून "रक्तदान शिबिर" आयोजित करण्याचे आले होते. त्या प्रमाणे रक्तदान करण्याचे जनतेस आवाहन केले होते. त्या आवाहनास प्रतिसाद देऊन देत "आशीर्वाद सांस्कृतिक कला क्रीडा व सामाजिक संस्था" यांच्या वतीने ज्येष्ठ समाजसेवक स्वर्गीय हरिश्चंद्र कृष्णा ठाकुर(आप्पा ) यांच्या स्मरणार्थ दिनांक .१४/०६/२०२० रोजी म्हणजेच रक्तदाता दिवस या दिवशी

No comments