web-ads-yml-728x90

Breaking News

महानगरपालिकेकडून काहिएक विकासकामे झाली नाही;भरमसाट मालमत्ता करबाबत टेंभोडे व वळवली ग्रामस्थ त्रस्त

 


BY - संतोष चाळके,युवा महाराष्ट्र लाइव – नवी मुंबई

दि.२६/०१/२०२२ रोजी झालेल्या टेंभोडे,वळवली ग्रामस्थ आणि महानगरपालिकेच्या सहआयुक्त सौ.वंदना गुळवे मॅडम,मालमता कर विभाग अधिकारी श्री. सुनील मानकामे, प्रभागसमिती(ब)अधिकारी श्री. सदाशिव कवठे व इतर शासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत टेंभोडे ग्रामस्थांनी महानगरपालिकेच्या सर्वे व मालमत्ता करा संबंधी पूढील प्रश्न उपस्थित केले आहेत.

 (०१) सण २०१५ साली टेंभोडे ग्रामपंचायतीने ग्रामसभा आयोजित केली असता त्या वेळी टेंभोडे गावास महानगरपालिकेत समाविष्ट करू नये असा ठराव सर्वांच्या संमतीने मंजूर झाला असताना आणि ग्रामस्थांचा महापालिकेत समाविष्ट होण्यास विरोध असताना देखील आमचा गाव जबरदस्तीने महापालिकेत समाविष्ट का करण्यात आला?

(०२) सण २०१५ साली पनवेल महानगर पालिकेत समाविष्ट होणाऱ्या गावाचा कर हा ०५ वर्षापर्यंत माफ करण्यात येईल असे आश्वासन प्रशासनातर्फे देण्यात आले असताना देखील त्या आश्वासनाची अंमलबजावनी न करता मोघलाई पद्धतीने कर वसुलीचा तगादा नव्याने समाविष्ट झालेल्या गावातील ग्रामस्थांच्या मागे महापालिका का करत आहे?

(०३) टेंभोडे गावाला महानगरपालिके मध्ये समाविष्ट केल्या पासून महानगर पालिकेच्या टेंभोडे गावास कोणत्या सोयी सुविधा दिल्या आहेत? की त्या सुविधाच्या मोबदल्यात टेंभोडे ग्रामस्थांनी महानगर पालिकेस कर भरावे उदा.पाणी पुरवठा,रस्ते,सांडपाणी,गटर व्यवस्था ई.सारख्या मूलभूत गरजा आणि नागरी सुविधा सुद्धा आतापर्यंत टेंभोडे ग्रामस्थाना महापालिका का पुरउ शकलेलि नाही.

(०४)पनवेल महानगर पालिका ही "ड" प्रवर्गातील असताना देखील कर आकारणी ही "क"प्रवर्गातील महापालिकेच्या समान का करण्यात आली? कर आकारणी करता वेळी "ड" प्रवर्गातील कोणत्या महापालिकेचा आढावा सभागृहात आलेला होता याबाबत स्पष्टीकरण मीळावे.

(०५)नवी मुंबई महानगरपालिकेतील नेरुळ सेक्टर -०६ येथे ३६ पैसे कर आकारणी असताना पनवेल महानगरपालिकेतील नवीन पनवेल सेक्टर ०६ येथील कर आकारणी ९४ पैसे दराने करण्यात आली आहे.याचा अर्थ हा होतो की पनवेल महानगरपालिका ही नवी मुंबई महानगरपालिकेपेक्षा जास्त प्रगतशील आहे असे समजायचे का?(०६) टेंभोडे व वळवली ग्रामस्थ सण २०१६ रोजी पासुन ग्रामपंचायतीस   कर भरत असताना देखील पनवेल महानगरपालिका सण २०१६ ते २०२१ पर्यंतचा कर भरण्याची सक्ती का करण्यात येत आहे?

(०७) पनवेल महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या गाढेश्वर धरणाची पाणी पातळी ही फेब्रुवारी महिण्यात  कमी होते आणि पाणी टंचाई निर्माण होते अशा या पाणी टंचाईवर उपाय म्हणून महानगरपालिके कडून पाणी टंचाईवर मात करण्यासाठी काय उपाय योजना केल्या आहेत?

(०८)महानगर पालिकेस कर भरल्यास सण २०२२ पर्यंतची बांधकामे ही अधिकृत करण्यात येतील का?

(९)महानगरपालिका बांधकाम परवानगी देनार आहे का? या ५ वर्षात किती गावांना बांधकाम परवानगी दिली आहे?(१०)महानगरपालिकेने बैलेन्सशीट दाखवावि जेणेक़रुन महानगरपालिकेने सन २०१६ पासुन आज रोजी पर्यंत कामे केलेली आहेत ते स्पष्ट होईल. वरील एकही विषय महानगरपालिकेने मार्गी लावलेला नाही. सर्व ग्रामस्थानी एक सुराने सांगीतले कि टेंभोडे व वळवली गावांना महानगरपालिकेतुन वगळनेत यावेत.आम्हाला महानगरपालिका नको सर्व ग्रामस्थांच्या वतीने निषेध करण्यात आला आणि **महानगरपालिका हटाव गाव बचाव **असा नारा देन्यात आला.नवी मुंबई महानगरपालिकेच्या विरोधात ज्या प्रकारे १४ गाव संघर्ष समितीने लढा देऊन महापालिकेतून १४ गावांना वगळून पुन्हा ग्रामपंचायत प्रशासन स्थापन करण्यात आले त्याच धर्तीवर आंदोलन उभे करून पनवेल महानगर पालिकेस विरोध म्हणून लढा उभारण्याची घोषणा टेंभोडे ग्रामस्थांकडून करण्यात आली आणि या ठिणगीने जर असाच पेट धरला तर महापालिकेच्या विरुद्ध वणवा पेटण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.

No comments