रस्त्यात पडलेल्या सुमारे दोन तोळयांची चैन प्रामाणिकपणे मालकाला परत करणार्या जनसेवा शिक्षण मंडळ शिवळे कॉलेज मुरबाडच्या साधना मोरे (घुडे) यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड ,ठाणे
जनसेवा शिक्षण मंडळ मुरबाड , संचालित शांतारामभाऊ घोलप कला , विज्ञान व गोटीरामभाऊ पवार वाणिज्य महाविद्यालय, शिवळे येथे वरिष्ठ क्लार्क म्हणून कार्यरत असलेल्या सौ साधना मोरे(घुडे) यांना दोन दिवसांपूर्वी शिवळे येथे बँकेच्या कामानिमित्त गेलेल्या असताना 2 तोळे ग्रामची सोन्याची चैन रस्त्यावर पडलेली सापडली आपल्या कामाविषयी प्रचंड निष्ठा व प्रामाणिक असलेल्या सौ साधना मोरे(घुडे)मॅडम यांनी आपण प्रत्यक्ष जीवनात ही प्रामाणिक असल्याचे दाखवून दिले, बँकेचे काम संपल्यानंतर महाविद्यालयात येऊन त्यांनी आपणांस 2 तोळे ग्रामची सोन्याची चैन सापडल्याचे सर्वांना सांगितले व ज्यांची असेल त्यांनी ओळख पटवून ती घेऊन जावी असे आवाहन केले, त्यानुसार शिवळे परिसरात कोणाची सोन्याची चैन हरवली असल्याचा शोध घेण्यात आला, महाविद्यालयातील प्रा.डॉ. शैलेश डोंगरे यांच्या गावाजवळ असलेल्या आंबर्जे गावातील श्री. ज्ञानेश्वर बबन परटोले व सौ.संगीता ज्ञानेश्वर परटोले यांची चैन हरवल्याचे लक्षात आले प्रा.डॉ. शैलेश डोंगरे यांच्या तर्फे सदर दाम्पत्याला संपर्क करण्यात आला व रीतसर ओळख पटवून सौ. साधना मोरे(घुडे) मॅडम यांनी त्यांना सापडलेली चैन परटोले यांना दिली . साधना मोरे(घुडे) मॅडम यांच्या प्रमाणिक व आदर्श वागणुकीचे जनसेवा शिक्षण मंडळ मुरबाडतर्फे व महाविद्यालयातर्फे कौतुक करण्यात येत आहे.
No comments