web-ads-yml-728x90

Breaking News

एस आर पी एफ बल गट क्र २ पुणे च्या जवानांनी राष्ट्रीय सन केला वेगळ्या पद्धतीने साजरा

 


BY - अफसर शेख,युवा महाराष्ट्र लाइव – पुणे

एस आर पी एफ ग्रुप 2 मध्ये कार्यरत असलेले  जवान राष्ट्रीय सण दर वर्षी वेगळया पद्धतीने साजरी करतात.सालाबाद प्रमाणे याही वर्षपोट भरण्यासाठी कामावर जाणारे गोरगरीब नागरिक,  त्यांच्यासोबत राहून त्यांना ध्वजाचे मानचिन्ह व मिठाई देऊन त्यांच्यासोबत प्रजासत्ताक दिवस वेगळ्या पद्धतीने साजरा केला. गेल्या सात वर्षापासून हे जवान हा उपक्रम राबवत आहे.

 या उपक्रमामागे निस्वार्थीपणे  एकच उद्देश असून तो लोकांच्या मनात देशाविषयी प्रेम व खाकी विषयी  आदर निर्माण करणे हा आहे.आज  रोजी संविधान चौक ,जांभुळकर चौक, वानवडी, फातिमानगर ,पुलगेट या परिसरात सुमारे 40 ते 50 लोकांना भेटून त्यांच्यासोबत हा उपक्रम राबवण्यात आलाया वेळी युगराज पुजारी, सचिन खवले , सचिन देवडे ,संदीप खुडे (सामाजिक कार्यकर्ते) उपस्थित होते. यापुढेही हा उपक्रम असाच राबवण्यात येईल असे युवराज पुजारी यांनी सांगितले.

No comments