मतदारांनी सारे काही झुगारून लोकशाही निवडली - देवेंद्र फडणवीस
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई
सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक संतोष परब मारहाण प्रकरणावरून अटीतटीची झाली होती. गुरुवारी झालेल्या निवडणुकीचा निकाल शुक्रवारी घोषित झाला. यात भाजपचा दणदणीत विजय झाला आहे. या निवडणुकीबद्दल बोलताना, "सरकारी यंत्रणेचा गैरवापर, पोलिसी दडपशाही, सत्तेची अरेरावी हे सर्व झुगारून मतदारांनी लोकशाही निवडली आहे," असे मत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी व्यक्त केले. फडणवीस यांनी ट्विट करत आपले मत व्यक्त केले.
No comments