'बियरच्या बाटल्या रिकाम्या करण्यापेक्षा, रक्ताच्या बाटल्या भरूया' असा सामाजिक संदेश देत पडघ्यात रक्तदान शिबिर संपन्न
BY - युवा महाराष्ट्र लाइव – भिवंडी,ठाणे
राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा पडत असल्यामुळे सकारात्मक प्रतिसाद देत सानेगुरुजी समाजसेवी शिक्षक संघाच्या वतीने भिवंडी तालुक्यातील पडघा ग्रामपंचायत हॉल येथे 'बियरच्या बाटल्या रिकाम्या करण्यापेक्षा, रक्ताच्या बाटल्या भरूया' असा सामाजिक संदेश देऊन रक्तदान शिबिराचे आयोजन करून नवीन वर्षाचे स्वागत केले आहे. सदर रक्तदान शिबिरचे उद्घाटन ठाणे जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पाताई पाटील यांनी केले असून प्रमुख म्हणून भिवंडी पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी निलम पाटील,विस्तार अधिकारी संजय अस्वले,भिवंडी पंचायत समितीचे सभापती महेंद्र पाटील, उपसभापती एकनाथ पाटील, कृषी उपन्न बाजार समिती सभापती डॉ. संजय पाटील, पडघा ग्रामपंचायत उपसरपंच अभिषेक नागावेकर, पंचायत समिती माजी उपसभापती गुरुनाथ जाधव, माजी उपसभापती महादेव घरत, माजी उपसभापती गजानन आसवारे, पडघा सोसायटीचे सभापती श्रीकांत गायकर , पंचायत समिती सदस्य शैलेश शिंगोले, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे ठाणे जिल्हा सचिव नरेश पाटील, समाजसेवक गणेश गुळवी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा, रक्तपेढीचे सहकार्य लाभले. यावेळी पडघा व परिसरातील ५८ नागरीकांनी रक्तदान केले. ३१ डिसेंबर २०२१ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करणाऱ्या साने गुरुजी शिक्षक संघाचे यावेळी पडघा परिसराच्या वतीने विशेष कौतुक करण्यात आले. सानेगुरुजी समाजसेवी शिक्षक संघाच्यावतीने रक्तदान शिबिराचे यंदाचे एकविसावे वर्ष होते. कोरोना काळात नक्कीच एक सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही हा उपक्रमाचे आयोजन केले होते.
No comments