web-ads-yml-728x90

Breaking News

बीडीडी चाळींचा पुनर्विकास प्रकल्प जलद गतीने पूर्ण करणार – गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

नायगाव येथील बीडीडी चाळ पाडल्यानंतर रिक्त जागी होणाऱ्या नव्या इमारतींच्या बांधकामामुळे नायगाव बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पातील पहिल्या टप्प्याला प्रारंभ होत आहे. बीडीडी चाळींचा पुनर्विकास प्रकल्प जलद गतीने पूर्ण करून मार्गी लावला जाईलअसे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.मुंबईतील नायगाव बीडीडी चाळीतील चाळ क्रमांक ५ बी आज निष्कासित करून पाडण्याचे काम सुरु करण्यात आले. त्याठिकाणी नवीन इमारतीच्या बांधकामाला लवकरच प्रारंभ केला जाणार आहे. यावेळी गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकरम्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकरम्हाडा मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी डॉ. योगेश म्हसेकार्यकारी अभियंता प्रशांत धात्रक आदी उपस्थित होते.यावेळी प्रसार माध्यमांशी बोलतांना गृहनिर्माण मंत्री डॉ. आव्हाड म्हणाले की,  बीडीडी चाळींच्या प्रत्येक दगडाला इतिहास असून सामाजिकसांस्कृतिक चळवळीची साक्ष देणाऱ्या या चाळी आहेत. सुमारे शंभर वर्ष जुन्या या चाळीतील इमारतींच्या पुनर्विकासाद्वारे येथील रहिवाशांना सर्व सुविधायुक्त मोठे घर देऊन त्यांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावण्याचे अनेक वर्षापासून पाहिलेले स्वप्न आज नायगाव बीडीडी चाळीतील चाळ क्रमांक ५ बी निष्कासित करून प्रत्यक्षात साकारत आहे.

No comments