web-ads-yml-728x90

Breaking News

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलाविली कोरोना आढावा बैठक

 


BY -  युवा महाराष्ट्र लाइव नवी दिल्ली

मागील काही दिवसांमध्ये देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोना संदर्भात आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडियो कॉन्फ्रेंसच्या माध्यमातून (Meeting through video conference) आढावा बैठक बोलाविली आहे. बैठक दिल्लीत सुरू आहे. (Meeting underway in Delhi) कोरोना संदर्भातील आढावा बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया, गृहसचिव उपस्थित आहेत.

आठ महिन्यातील सर्वात जास्त रुग्णसंख्या -

याआधी आधी रविवारी सकाळी आठ वाजता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले, (Health Ministry told at 8 in the morning) भारतात मागील 24 तासात 1,59,632 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. मागील जवळपास 8 महिन्यातील (224 दिवस) ही संख्या सर्वात जास्त आहे. नवीन रुग्णसंख्येसोबतच देशातील अॅक्टिव्ह बाधितांची संख्या ही 5,90,611 इतकी झाली आहे. मागील 24 तासांत ओमायक्रॉनच्या 552 रुग्ण समोर आले आहेत. यासोबत भारतात एकूण ओमायक्रॉन बाधितांची संख्या ही 3600च्या पार पोहोचली आहे. महाराष्ट्रात ओमायक्रॉनच्या सर्वाधिक (Maharashtra omicron cases) 1,009 रुग्ण समोर आले आहेत. तर यानंतर दिल्लीत 513, कर्नाटकात 441, राजस्थानमध्ये 373, केरळमध्ये 333 आणि गुजरातमध्ये 204 रुग्ण समोर आले आहेत.

No comments