web-ads-yml-728x90

Breaking News

कृषि पणन मंडळाच्या नव्या स्वरुपातील मोबाईल अ‌ॅपचे पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

 


BY - अफसर शेख,युवा महाराष्ट्र लाइव – पुणे

सहकार व पणनमंत्री बाळासाहेब  पाटील यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या नव्या स्वरुपातील मोबाईल अॅपचे उद्घाटन करण्यात आले.कार्यक्रमास  आमदार व महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ सभापती दिलीप मोहिते,  सहकार आयुक्त व निबंधक सहकारी  संस्था अनिल कवडे  पणन संचालक तथा कार्यकारी संचालक महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ सुनिल पवार,  महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाचे  सरव्यवस्थापक दिपक शिंदे, नाबार्ड  व डी. एम. आयचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.मोबाईल अॅपमुळे शेतकऱ्यांना शेतमालाचे बाजारभाव घरबसल्या उपलब्ध होणार आहेत. शेतमालाचे बाजारभाव व कृषि पणनविषयक माहिती उपलब्ध असलेल्या या मोबाईल अॅपचा शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणावर वापर करावा असे आवाहन मंत्री श्री.पाटील यांनी यावेळी केले.

No comments