web-ads-yml-728x90

Breaking News

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून सुभाषचंद्र बोस, बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राची अस्मिता, मराठी माणसाचा स्वाभिमान, महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाच्या न्याय, हक्कासाठी अखेरपर्यंत संघर्ष केला. विचार आणि उच्चारांमध्ये सत्यता, स्पष्टता, पारदर्शकता असलेले ते नेते होते. प्रतिभाशाली कलावंत ते महान राजकीय नेतृत्वापर्यंतचा त्यांचा हा प्रवास बहुआयामी व्यक्तिमत्वाची साक्ष देणारा आहे. बाळासाहेबांनी वक्तृत्व, नेतृत्व, कर्तृत्वाच्या बळावर मराठी मनावर कायम अधिराज्य गाजवले. त्यांना अपेक्षित असलेला महाराष्ट्र घडवणे हीच दिवंगत बाळासाहेबांना खरी आदरांजली ठरेल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री पवार यांनी जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण करुन अभिवादन केले.

No comments