समुद्रात बेकायदेशीर डिझेल विक्री करणाऱ्या टोळीला अटक, नवी मुंबई पोलिसांना कारवाई
BY - संतोष चाळके,युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई
भेसळ आणि भ्रष्टाचार सध्या सर्व जागी सुरु आहे. प्रत्येक क्षेत्रात अवैध धंदे सुरु असून समुद्रातही चूकीच्या मार्गाने डिझेल विक्री (Illegal diesel Sell) होत असल्याचं समोर आलं आहे. अवैधरित्या समुद्रातील मोठ्या जहाजांमधून कमी किंमतीत डिझेल विकत घेऊन त्याची बेकायदेशीरपणे विक्री करणाऱ्या टोळीला पकडण्यात नवी मुंबई पोलिसांना (Navi Mumbai Police) यश आलं आहे.नवी मुंबई पोलिस आणि नागरी पुरवठा संचालक यांनी मिळून संयुक्त ही कारवाई केली. ज्यातून एकूण 5 आरोपींच्या टोळीला अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 16 लाख किंमतीचे तब्बल 21 हजार 470 लीटर इतके डिझेल जप्त करण्यात आले आहे.
रोख रकमेसह दोन बोटीही जप्त
लाखोंचे डिझेल आरोपींकडून जप्त केल्यानंतर पोलिसांनी आरोपींकडून 6 लाख 87 हजार रुपयांची रोख रक्कम आणि डिझेल विक्री करण्यासाठी वापरण्यात आलेल्या 2 बोटी ताब्यात घेतल्या आहेत. सदर आरोपी अनधिकृतरित्या मोठ्या जहाजातून 60 रुपये प्रतिलिटर दराने डिझेल खरेदी करून समुद्रातील लहान बोटीधारकांना बेकायदेशीरपणे बाजारभावापेक्षा कमी किंमतीत विकत होते. या टोळीत आणखी किती जण सहभागी आहेत आणि या आरोपींनी आतापर्यंत कोणा-कोणाला या डिझेलची विक्री केली आहे. या साऱ्याचा अधिक तपास नवी मुंबई पोलिस सध्या करत आहेत.
No comments