web-ads-yml-728x90

Breaking News

‘उद्यमशील विद्यार्थी घडवून देशात आदर्श निर्माण करावा व विद्यापीठाचे मानांकन उंचवावे’ – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे आवाहन

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

सोलापूर हे औद्योगिक शहर आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापिठाने स्थानिक उद्योगांना पूरक रोजगारक्षम अभ्यासक्रम राबवून उद्यमशील विद्यार्थी घडवावेत, तसेच स्टार्टअप्सना प्रोत्साहन देऊन देशातील विद्यापिठांकरिता आदर्श तयार करावा, असे सांगताना विद्यापीठाने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून आपले आंतरराष्ट्रीय मानांकनही उंचवावे, असे आवाहन राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी केले.राज्यपाल कोश्यारी यांच्या दूरस्थ उपस्थितीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा सतरावा दीक्षांत समारंभ मंगळवारी (दि. ११) ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने झाला त्यावेळी राजभवन येथून सहभागी होताना ते बोलत होते.कार्यक्रमाला सोलापूर येथून विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस, प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. विकास पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. सुरेश पवार व परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपूर प्रामुख्याने उपस्थित होते.राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मातृभाषेतील शिक्षणाला महत्त्व देण्यात आले आहे याचा उल्लेख करून विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषा अवश्य शिकावी तसेच फ्रेंच, जर्मन आदी भाषा देखील शिकाव्या; मात्र मातृभाषा व मातृभूमीप्रती आपल्या कर्तव्याला विसरू नये असे राज्यपालांनी सांगितले.

No comments