web-ads-yml-728x90

Breaking News

राम नाईक यांचे कार्य प्रेरणादायी – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

उत्तरप्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांची आत्मकथा मांडणाऱ्या चरैवेति! चरैवेति!! या लेखसंग्रहावर आणि त्यांच्या जीवनकार्यावर आधारित कर्मयोद्धा- राम नाईक‘ या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. राम नाईक यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन श्री.कोश्यारी यांनी केले.राजभवन येथील बँक्वेट हॉलमध्ये हा पुस्तक प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी श्री.कोश्यारी बोलत होते. या प्रकाशन सोहळ्याला माजी शिक्षण मंत्री विनोद तावडेखासदार गोपाल शेट्टीआमदार आशिष शेलारआमदार मंगलप्रभात लोढानवभारत टाइम्सचे संपादक शचिन्द्र त्रिपाठीपुस्तकाचे प्रकाशक आनंद लिमयेविधिमंडळ सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले, ‘कर्मयोद्धा राम नाईक‘ हे पुस्तक प्रेरणादायी आहे. श्री.नाईक यांनी केलेला संघर्ष आणि त्यातून मिळविलेले यश हे देशासाठी मार्गदर्शक‍ आहेत. श्री.नाईक यांनी त्यांचे जीवन जनतेच्या सेवेत समर्पित केले आहे. विशेषत: कुष्ठरोग पिडितांसाठी सातत्याने लढा देवून त्यांना न्याय मिळवून देण्याचे कार्य त्यांनी केलेले आहे. त्यांच्या या प्रेरणादायी जीवनावर आधारित कर्मयोद्धा राम नाईक‘ हे पुस्तक प्रकाशित होत आहे. याचा आनंद होत आहे. श्री.नाईक यांनी देशनिर्माण कार्यात दिलेले योगदान नक्कीच वाखाणण्यासारखे आहे. अशाच प्रकारे नव्या पिढीने देखील एकत्रित येवून काम करावे. तसेच या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांचे प्रेरणादायी कार्य जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहचावेअशा शुभेच्छा श्री.कोश्यारी यांनी यावेळी दिल्या.

1 comment:

  1. Book the Hyatt Regency near Mohegan Sun - Legalbet.co.KR 온카지노 온카지노 クイーンカジノ クイーンカジノ 449Asian Handicap - Asian Handicap - AsianHandicap - AiGadin.com

    ReplyDelete