web-ads-yml-728x90

Breaking News

जिवाची पर्वा न करता रुग्ण सेवा बजावणाऱ्या डॉक्टरांना UHRC करोना योद्धा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

युनिव्हर्सल ह्युमन राईट्स काऊन्सिल भारत चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.श्री.तरुण जी बाकोलिया,महिला राष्ट्रीय अध्यक्षा डॉ.सौ.सुमन जी मौर्य यांच्या आदेशाने व महाराष्ट्र अध्यक्ष श्री. जितेंद्र दगडू दादा सकपाळ, महाराष्ट्र महिला अध्यक्ष सौ. सुवर्णा ताई कदम यांच्या सूचनेनुसार व मुंबई अध्यक्ष श्री. अमोल वंजारे यांचा अध्यक्षतेखाली 

मुंबई जिल्ह्याच्या वतीने शुक्रवार दि. १०/१२/२०२१ रोजी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दीन व युनिव्हर्सल ह्युमन राईट्स काऊन्सिल भारत च्या स्थापना दिना निमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय ( बृहन्मुंबई महानगरपालिका) टागोर नगर, पोस्ट ऑफीस बाजूला , विक्रोळी ( पूर्व) मुंबई येथे रुग्णांना फळ वाटप,वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मास्क वाटप व आपल्या जिवाची पर्वा न करता रुग्ण सेवा बजावणाऱ्या डॉक्टरांना UHRC करोना योद्धा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करुन साजरा करण्यात आला.

 तसेच आपल्या UHRC संघटनेच्या स्थापना दिनाच्या आनंदाच्या क्षणी सर्व मुंबई पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत केक कापून तो साजरा करण्यात आला व आपले मुंबई अध्यक्ष श्री.अमोल वंजारे यांना संघटनेतील कर्यकालाचे एक वर्ष पूर्ण झाल्या बद्दल शुभेच्छा दिल्या 

त्याप्रसंगी मुंबईतील सर्व पदाधिकारी,मुंबईत वास्तव्यास असलेले संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी व सभासद उपस्थित होते. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री.जितेंद्र दगडु सकपाळ,मुंबई अध्यक्ष श्री.अमोल वंजारे,प्रदेश महासचिव पूर्व विदर्भ श्री.संतोष मोरेश्वर चाचड,मुंबई महिला महासचिव,*सौ.पूजा नीलेश दळवी,मुंबई महिला सचिव सौ.वसुधा वाळुंज, श्री.दत्ताराज श्रीपत आंब्रे*, चिंचपोकळी सचिव, श्री.महेश प्रकाश आंब्रे,सचिव घाटकोपर विधानसभा,श्री.हितेश गायकवाड घाटकोपर सहसचिव,श्री.प्रकाश तुकाराम आंब्रे घाटकोपर ब्लॉक प्रेसिडेंट, श्री.सुहास परब चिंचपोकळी ब्लॉक प्रेसिडेंट, श्री.संजीव परमार दादर ब्लॉक प्रेसिडेंट, श्री.संदीप वारिस कालिना ब्लॉग प्रेसिडेंट,सौ.प्रमिला दि. अडसूळ परेल महिला ब्लॉग प्रेसिडेंट,सौ.नीता कडलग सदस्य,अंगमा मुदलियार सदस्य,मीरा सुधीर डाडर सदस्य,श्री.अमोल कासार सदस्य,श्री.योगेश माळवे सदस्य व सन्माननीय पाहुणे श्री.संदीप भोज, श्री.अमित देशमुख उपस्थित होते.

No comments