web-ads-yml-728x90

Breaking News

PM Modi Twitter Hack : मोदींचं अकाऊंट हॅक करताना Internal System चा वापर नाही - सूत्रांची माहिती

 

BY -  युवा महाराष्ट्र लाइव नवी दिल्ली


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ट्विटर अकाऊंट मध्यरात्री दोन वाजल्याच्या दरम्यान हॅक करण्यात आलं. हॅकरने मोदींच्या ट्विटर अकाऊंटवरुन बिटकॉईनला अधिकृत मान्यता देत असल्याचं ट्विट केलं. पंतप्रधान कार्यालयाला ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ ट्विटरच्या अधिकाऱ्यांना ही बाब लक्षात आणून देत मोदींचं अकाऊंट पूर्ववत केलं. या प्रकारानंतर ट्विटरने या प्रकरणात चौकशीला सुरुवात केली आहे.प्राथमिक चौकशीत मोदींचं ट्विटर अकाऊंट हॅक करण्यासाठी ट्विटरच्या Internal System चा वापर झालेला नसल्याची माहिती सूत्रांनी India Today ला दिली. "ट्विटरने आतापर्यंत केलेल्या अंतर्गत चौकशीच्या माध्यमातून हे समोर आलं आहे की पंतप्रधान मोदींचं अकाऊंट हॅक करताना ट्विटरच्या इंटर्नल सिस्टीमचा वापर झालेला नाही." मागच्या वर्षात हॅकर्सची जगभरातील प्रमुख नेत्यांची ट्विटर अकाऊंट हॅक केली होती. याच पॅटर्नच्या माध्यमातून मोदींचं ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आल्याचा ट्विटरला संशय आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी सुरु राहणार आहे.

No comments