web-ads-yml-728x90

Breaking News

राज्यपालांच्या हस्ते पं. हृदयनाथ मंगेशकर यांना मोहम्मद रफी जीवन गौरव पुरस्कार प्रदान

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

मोहम्मद रफी हे दैवी प्रतिभा लाभलेले महान गायक होते. उत्तम संगीताच्या माध्यमातून परमेश्वराशी तादात्म्य पावता येते. संकटप्रसंगी तसेच निराशेच्या प्रसंगी संगीतच मनाला नवी आशा व उभारी देते, असे सांगून यापुढेही अनेक मोहम्मद रफी व तलत मेहमूद यांसारखे गायक निर्माण व्हावे, अशी अपेक्षा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केली.राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते ज्येष्ठ संगीतकार, गायक पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना मोहम्मद रफी जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.राज्यपालांच्या हस्ते यावेळी पार्श्वगायिका कविता कृष्णमुर्ती यांना देखिल मोहम्मद रफी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कविता कृष्णमुर्ती यांच्या अनुपस्थितीत त्यांचे पती तथा ज्येष्ठ व्हायोलिनवादक डॉ. एल. सुब्रमण्यम यांनी पुरस्कार स्वीकारला. स्पंदन आर्टसतर्फे आयोजित हा पुरस्कार सोहळा रंगशारदा सभागृह, मुंबई येथे संपन्न झाला.

No comments