web-ads-yml-728x90

Breaking News

ग्रामीण आरोग्य व्यवस्थेची गुणवत्ता वाढण्यास प्रशिक्षण कार्यक्रम उपयुक्त – सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे

 BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

टेमासेक फाऊंडेशन, सिंग हेल्थ आणि महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने राबवला जाणारा प्रशिक्षण कार्यक्रम ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेची गुणवत्ता वाढवण्यास उपयुक्त ठरेल, असा विश्वास सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे.टेमासेक फाऊंडेशन, सिंग हेल्थ आणि महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या हॉस्पिटल इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅनिंग, डिझाईन अँड फ्लो कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी श्री. राजेश टोपे बोलत होते.दूरदृश्यप्रणालीद्वारे झालेल्या या कार्यक्रमात टेमासेक फाऊंडेशनचे समुह मुख्य कार्यकारी अधिकारी प्रो, आयव्ही, टेमासके फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी बेनेडिक्ट थेओंग, प्रो. टँग, प्रो. ओंग, श्रीमती विजया राव आदी दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

No comments