web-ads-yml-728x90

Breaking News

शेतीचे आधुनिक ज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

कृषी उत्पादने व कृषी आधारित वस्तूंचे भौगोलिक मानांकन होऊन त्यावर पेटंट मिळविले तर शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाची दुप्पट ते चौपट दाम मिळेल असे सांगून शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीचे नवीनतम ज्ञान देश विदेशातून मिळविले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.रासायनिक शेतीचे दुष्परिणाम पाहून शेतकऱ्यांनी पुन:श्च सेंद्रिय शेतीची कास धरावी असे सांगताना कृषी विद्यापीठांनी शेतीचे आधुनिक ज्ञान व तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पुढाकार घ्यावा यासाठी आपण सर्व कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंना सूचना करू, असे  राज्यपालांनी सांगितले.वंदे भारत विकास फाउंडेशन व ॲडराईज इंडिया यांनी शेतकऱ्यांच्या शिक्षण, प्रशिक्षण व कौशल्यवर्धनासाठी विकसित केलेल्या ‘वंदे किसान ॲप’चे लोकार्पण राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते गुरुवारी (दि. २) राजभवन येथे करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

No comments