web-ads-yml-728x90

Breaking News

मुंबई क्रिकेट टीम आयोजित मुंबई विरुद्ध छत्तीसगड सामन्यानसाठी युनिव्हर्सल ह्यूमन राईटस मुंबई सांताक्रूझच्या वतीने सहकार्य

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

मुंबई क्रिकेट टीम आयोजित मुंबई विरुद्ध छत्तीसगड सामन्यानसाठी युनिव्हर्सल ह्यूमन राईटस मुंबई सांताक्रूझच्या वतीने सहकार्य करण्यात आले होते परंतु सतत दोन दिवस पडणाऱ्या पाऊसामुळे सामना रद्द करण्यात आला होता परंतु बाहेरून आलेल्या व्हीलचेयर छत्तीसगड क्रिकेट टीम व मुंबई टीमला युनिव्हर्सल ह्यूमन राईटसच्या वतीने मी व माझ्या सहकाऱ्यांनी जागतिक अपंग दिनानिमित्त भेट दिली व त्याच्या बरोबर संपुर्ण दिवस काढला त्या दरम्यान त्यांना क्रिकेट खेळताना होणाऱ्या अनेक अडचणी जाणून घेतल्या, आपल्या देशात अनेक स्पोर्ट्सला आर्थिक सहकार्य करणाऱ्या कंपन्या, जाहिरातदार मिळतात किंवा त्या त्या राज्याच्याकडून किंवा केंद्र सरकारकडून सहकार्य मिळते परंतु अपंग व्हिलचेयर क्रिकेट टिमला कोणत्याही प्रकारचे सहकार्य मिळत नाही. त्यामुळे प्रवासा पासून त्यांच्या राहण्यासाठी जेवण्यासाठी अनेक अडचणीला सामोरे जावे लागते. आजच्या सामन्यासाठी केलेल्या सहकार्याचे समाधान मानून त्यांच्यासाठी विशेष प्रयत्न करण्यासाठी युनिव्हर्सल ह्यूमन राईटस त्याच्या पाठी उभी राहील असे आश्वासन दिले.

No comments