web-ads-yml-728x90

Breaking News

शिवळे महाविद्यालयात राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न

 


BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइवमुरबाड,ठाणे

जनसेवा शिक्षण मंडळ संचलित , पवार वाणिज्य महाविद्यालय. शिवळे व IQAC व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 'Roll Non teaching in Adminitration & Accredition process' या विषयावर दि. 27/11/2021 रोजी राष्ट्रीय कार्यशाळा ऑनलाईन पध्दतीने आयोजित केली होती. या कार्यशाळेचे प्रास्ताविक ग्रंथपाल श्री. एन. डी. फड यंनी केले. कार्यशाळा आयोजित करण्याचा मानस त्यांनी स्पष्ट केला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. पाटील यांनी महाविद्यालयाच्या वाटचालीचा आढावा घेतला व महाविद्यालयाच्या प्रशासनात शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग कार्यशाळेचे अध्यक्ष म्हणून जनसेवा शिक्षण मंडळाचे सहसचिव श्री. बी. आर. हरड , उपस्थित होते. आपल्या भाषणात त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान असे स्पष्ट केले. कार्यशाळेचे प्रमुख वक्ते राष्ट्रीय ख्यातीचे तज्ज्ञ मांगदर्शक डॉ पियुष पहाडे उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात "नॅक प्रक्रिया व . त्यासाठी लागणारी माहिती शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यानी कशी तयार करावी, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. दुसरे वक्ते व प्रमुख मार्गदर्शक डॉ. दिपक ननावरे यांनी आपल्या भाषणात व्यवस्थापन शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांचे सहसंबंध, SSR या संदर्भात सखोल माहिती दिली. या कार्यशाळेत महाराष्ट्र व राज्याबाहेरील सुमारे 300 च्या आसपास प्राध्यापक व कर्मचारी सहभागी झाले. शेवटी महाविद्यालयाचे कार्यालयीन अधिक्षक श्री. ए. एम. पवार व वरिष्ठ लिपिक श्री. अनिल मोहपे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यशाळेचे सत्रसंचालन प्रा. बी. एस. आहेर यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्य लिपिक सौ. राजश्री घुडे यांनी केले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. व तांत्रिक सहकार्य प्रा. हेमांगी राणे व श्री. मयुर आवार यांनी केले. या कार्यशाळेला महाराष्ट्रातील विविध भागातून व विद्यापीठातून प्राध्यापक, प्राथमिक व माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्येने सहभागी झाले होते.

No comments