web-ads-yml-728x90

Breaking News

डॉक्टर पंकज पाटील शिवळे भागातील ग्रामस्थांचा आधारवड

 


BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइवमुरबाड,ठाणे

कोणताही आजार असला तरी आपल्याला त्या आजारावर मात करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला आणि डॉक्टरांची मदत घ्यावी लागते,अशाच मदतीला शिवळे येथील डॉ.पंकज पाटील हे शिवळे ग्रामस्थांचे आधारवड म्हणून प्रसिद्ध आहेत.कोणताही आजार असल्यास त्या आजारावर मात करण्यासाठी डॉ.पंकज पाटील हे आपली शक्ती पणाला लावतात.लांब-लांबून त्यांच्याकडे रुग्ण तपासणीकरिता येत असतात.अशा रुग्णांना मायेचा आधार देत त्यांच्या आजारावर उपचार करण्यासाठी तत्पर असतात.त्यांच्या या कलागुणांना आणि त्यांच्या या उपचारावर हजारो नागरिक बरे होताना निदर्शनास आले आहे.वय जरी लहान असलं तरी कीर्ती मात्र महान आहे असेच म्हणावे लागेल.ताप,थंडी,लुजमोशन,अंगदुखी,सर्दी,व अन्य आजाराचे त्यांच्याकडे उपचारासाठी येत असून येणारा प्रत्येक रुग्ण हा रुग्ण नसून त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य आहे अशी मनोधारणा बाळगून नैतिकता व माणुसकी जोपासण्याचे काम डॉक्टर पंकज पाटील करीत आहे. आपल्या भूतलावरील देव म्हणजे डॉक्टर. या डॉक्टरांनी कोरोना कालावधीत निर्भिड तेने काम केले आहे त्यांचा सन्मान YML NEWS ने केला आहे अशाच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे सुपुत्र म्हणून डॉक्टर पंकज पाटील यांनी माणुसकीची जपत पैशाला महत्त्व न देता केवळ रुग्णांच्या उपचारावर आपले आयुष्य बहाल केले आहे. त्यांच्या रुग्णालयात येणारा प्रत्येक रुग्ण हा बरा होऊनच गेला आहे याचे उदाहरण आमच्या डोळ्यासमोर आहे,त्यामुळे सर्वसामान्यातील माणूस त्यांच्याशी जोडला गेला आहे

त्यामुळे शिवळे,टोकावडा,कळमखांडे,कोरोवळे,शिरोशीपाडा,डेहणोली,व अन्य ग्रामीण भागातील सर्व ग्रामस्थांचे ते आधारवड बनले आहे.त्यांचे सामाजिक कार्य असेच अखंडित राहो अशा मनःपूर्वक शुभेच्छा त्यांना देत आहोत.

No comments