web-ads-yml-728x90

Breaking News

उपविभागीय अधिकारी नाईक वरिष्ठ पोलिस निरिक्षक प्रसाद पांढरे यांच्या नेतृत्वाखाली मुरबाड नगरपंचायत निवडणुक;मुरबाड पोलिसाचं संचालन

 


BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइवमुरबाड,ठाणे

मुरबाड नगरपंचायतीची निवडणुक पारपडत आहे.सदरची निवडणुक शांततेने पार पाडावी यासाठी पोलिस उपविभागीय अधिकारी नाईक यांच्या मर्गदर्शनाखाली मुरबाड ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक प्रसाद पांढरे यांच्या उपस्थितीत मुरबाड शहरात पोलिस अधिकारी कर्मचार्यांचे भव्य संचालन करण्यात आले.

  मुरबाड शहरातुन पोलिस अधिकारी कर्मचारी यांची संचालन फेरी काढुन 17 प्रभागामध्ये कायदासुव्यवस्था सुरळीत ठेवण्यात आला आहे.पेट्रोलिंग नाकाबंदी ग्रस्त ठेवुन मुरबाड नगरपंचायत निवडणुक शांततेने पार पडण्यासाठी वरिष्ठ पोलिस निरिक्षक प्रसाद पांढरे यांच्या नेतृत्वाखाली टोकावडा ,बदलापुर ,कुळगांव ,टिटवाळा, मुरबाड येथील अधिकारी पोलिस कर्मचारी सामील झाले आहेत.

17 प्रभागाच्या रिंगराऊड ग्रस्त करून सर्तकता उपस्थिती दाखवली.मुरबाड पोलिस ठाण्याचे 4 पोलिस अधिकारी 25 आमलदांर,टोकावडा पो.ठाण्याचे 1 पो.अधिकारी 5 आमलदांर ,कल्याण तालुका पो.ठाण्याचे 1 पो.अधिकारी 5 आमलदांर, कुळगांव पो.ठाण्याचे 1 पो.अधिकारी 5 आमलदांर अशा मोठया संख्येने बंदोबस्त तैनात झाला आहे.

No comments