web-ads-yml-728x90

Breaking News

पेट्रोलिंगने मुरबाड पोलिसानी पकडले चोरटयाना नागरिकांत समाधान

 


BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइवमुरबाड,ठाणे

मुरबाड शहर परिसरात वाढत्या चोर्याना आळा घालण्यासाठी पोलिस उपविभागीय अधिकारी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली मुरबाड पोलिस ठाण्याचे कर्तव्यदक्ष अभ्यासू वरिष्ठ पोलिस निरिक्षक प्रसाद पांढरे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस अधिकारी सोनवणे पीएसआय शेंडे हेड काँन्स्टेबल निचिते पो.नाईक मोरे शिंदे त्यांच्या सहकारी यांनी मिंडा कंपनीतुन वायर चोरी करणार्याना मुद्देमालासह अटक केली आहे.

  मिंडा कंपनीतुन 60 हजार किंमतीची वायर चोरी प्रकरणी टेम्पोसह चोरटयाना आटक केली आहे.त्यामुळे शहरात चोर्याना आळा बसणार आहे.वरिष्ठ पोलिस निरिक्षक प्रसाद पांढरे यांनी संपुर्ण शहरासह पोलिस हद्दीत दिवस रात्र पेट्रोलिंग सुरू ठेवल्याने चोरीचा गुन्हां उघडकीस आला आहे.चोरटयावर पोलिसाची करडीनजर असुन चोर्या गुन्हेगारीला कडक शासन करून सामान्य जनतेला दिलासा देण्याचा काम प्रसाद पांढरे यांनी केले आहे.मुरबाड नगरपंचायतीच्या निवडणुका पार्श्वभुमिवर पोलिसासमोर चोरटयासह गुन्हेगाराचं आव्हान होते परंन्तु कर्तव्यदक्ष पोलिसानी शांतता आबाधित राहावी चोर्यामार्या होणार नाहीत घडलेल्या गुन्हयाचा तपास करून नागरिकाना दिलासा देण्याचा मोठं काम केले आहे. 

  गेल्या दोन महिण्यापुर्वी चोरटयानी मुरबाड शहरात हौदास घातला होता त्यावर विशेषलक्ष केंन्द्रीत करून वरिष्ठ पो.निरिक्षक प्रसाद पांढरे यांनी गुन्हयाच्या प्रमाणात घर करणार्या प्रयत्न केला असुन नागरिकानी समाधान व्यक्त केला आहे.

No comments