web-ads-yml-728x90

Breaking News

मुंबई उपनगर जिल्ह्यातील भूस्खलन होणाऱ्या धोकादायक ठिकाणी उपाययोजनांसाठी ६१ कोटींच्या खर्चास पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली मंजुरी

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

जीवित हानी रोखण्यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील भूस्खलन होण्याची किंवा दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या धोकादायक ठिकाणांची तातडीने निश्चिती करावी. तसेच ज्या जागा अति धोकादायक आहेत तेथे संरक्षक भिंतीसह इतर उपाययोजना करण्याची कामे तातडीने सुरू करण्यात यावीत, असे सांगून या कामांसाठी ६१.४८ कोटींच्या खर्चास मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी मंजुरी दिली.मुंबई उपनगर जिल्ह्यातील भूस्खलन होणाऱ्या धोकादायक ठिकाणी करावयाच्या उपाययोजनांबाबत श्री. ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्यासह मुंबई महानगरपालिका, म्हाडा, भारतीय भूवैज्ञानिक, भौगोलिक सर्वेक्षण संस्था आदी कार्यालयांचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

No comments