यशवंतराव चव्हाण पुरस्काराने शहा दाम्पत्याचा सन्मान
BY - युवा महाराष्ट्र लाइव – सातारा
नारीशक्ती फौंडेशनच्या संस्थापिका सौ. सुनिशा शहा व सामाजिक कार्यकर्ते निलेश शहा या दाम्पत्याला विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नवी मुंबईत शनिवारी मुंबईच्या यशवंतराव चव्हाण फौंडेशनने समारंभपुर्वक शहा दाम्पत्याचा गौरव केला. यावेळी आमदार गणेश नाईक, यशवंतराव चव्हाण फौंडेशनचे अध्यक्ष संजय सावंत व मान्यवर उपस्थित होते. सौ. सुनिशा शहा या भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्या आहेत,
तर निलेश शहा भाजप उद्योजक आघाडीचे जिल्हाध्यक्ष म्हणून सातारा जिल्ह्यात काम पहातात. शहा दाम्पत्याने नारीशक्ती फौंडेशनमार्फत व व्यक्तिशः उभे केलेल्या सामाजिक तसेच राजकीय विशेषतः महिला सबलीकरणाच्या क्षेत्रातील कार्याचा प्रविण दरेकर यांनी आपल्या भाषणात आवर्जून उल्लेख केला. याप्रसंगी बोलताना सौ. सुनिशा शहा म्हणाल्या, "यशवंतराव चव्हाण यांनी शिक्षणाच्या क्षेत्रात दूरगामी पावलं टाकली.
याचे एक उदाहरण म्हणजे साता-यातील सैनिक स्कूलची केलेली स्थापना होय. सातारा जिल्ह्यातील काही गावांमधून सैन्यात भरती होण्याचे प्रमाण आजही मोठे आहे. त्याऐवजी सैनिक स्कूलमध्येच प्राथमिक स्वरुपाचे शिक्षण उपलब्ध झाल्यास सैन्यामध्ये अधिकारी पदावर पोहोचणे शक्य होईल. म्हणून सातारा येथील सैनिक स्कूलमध्ये नैशनल डिफेन्स अकादमीसाठी शिक्षण मिळण्याची सोय त्यांनी उपलब्ध करुन दिली." स्वर्गिय यशवंतराव चव्हाण यांच्या कर्मभुमितून आलेला मी एक छोटा कार्यकर्ता आहे. आज त्याच्या नावाने २०२० या वर्षाचा पुरस्कार मला मिळतोय. माझ्यासाठी हा खरोखर भाग्याचा दिवस आहे अशा शब्दात निलेश शहा यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
No comments