सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या सर्व अडचणी व समस्या सोडविण्यास प्राधान्य – गृहमंत्री वळसे-पाटील
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई
सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा असल्याने तसेच जिल्ह्यालगत गोवा राज्य असल्याने मोठ्या प्रमाणावर पर्यटक भेट देत असतात. जिल्ह्यातील वाढत्या अमली पदार्थ वाहतूक, विक्रीला आळा घालण्यासाठी सिंधुदुर्ग पोलिसांनी प्रभावी उपाययोजना करावी तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिले.तसेच जिल्हा पोलीस दलाच्या सर्व अडचणी व समस्या सोडविण्यास प्राधान्य देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध विकासकामे तसेच पोलीस दलाच्या अडचणींबाबत आढावा बैठक मंत्रालयात घेण्यात आली. या बैठकीला आमदार दिपक केसरकर, अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अपर मुख्य सचिव आनंद लिमये, प्रधान सचिव संजय सक्सेना, अतिरिक्त पोलीस महासंचालक राजेंद्र सिंह, अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय वर्मा, राज्य गुप्त वार्ता विभागाचे आशुतोष डुंबरे, सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
No comments