web-ads-yml-728x90

Breaking News

जेष्ठ पत्रकार नामदेव शेलार यांना यशवंतराव चव्हाण पुरस्काराने माजीमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते सन्मानित विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांचीही उपस्थिती

 


BY - संतोष चाळके,युवा महाराष्ट्र लाइव नवीमुंबई

गेली 31 वर्षे ठाणे जिल्हयात निर्भिड पत्रकारिता करत आलेले आज स्वतंत्र संपादक पत्रकार संघाचे एनजीओचे देशाचे अध्यक्ष पदावर काम करणार्या जेष्ठ पत्रकार नामदेव पांडुरांग शेलार यांना यशवंतराव चव्हाण पुरस्कार माजीमंत्री गणेशजी नाईक यांच्या हस्ते देण्यात आले.यावेळी कार्यक्रमाला विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर नवीमुंबई भाजपा अध्यक्ष घरत समाजसेवक आमले संस्थेचे संचालक संजय सावंत श्रीकांत भारतीय अध्यक्ष दपर्ण फाऊंडेशन सरचिटणीस भाजपा संजय शेटे सहकार नेते अनिल गजरे भरत नाना पाटील रमेश शेटे सचिन आचरे सुभाष बावडेकर यांच्यासह शिवसेना भाजपासह अन्य पक्षाचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा पार पडला विविध श्रेत्रातील मान्यवराना यावेळी मान्यवराच्या हस्ते पुरस्कार देवुन गौरवण्यात आले. 

ठाणे जिल्हा ग्रामीण भागातुन पत्रकारिता पुरस्कार साठी जेष्ठ पत्रकार नामदेव शेलार यांची निवड यशवंतराव चव्हाण फाऊंडेशन मुंबई यांनी शेलार यांच्या अखंड निर्भिड पत्रकारितेतुन केली आहे.त्यासाठी कोणतही नामकंन पत्र भरून घेतले नाही नामदेव शेलार ठाणे जिल्हयाचे विकासाचे सहकारी आहेत.गेल्या 31 वर्षात निर्भिड संघर्षमय पत्रकारिता करताना त्यांनी असंख्य पत्रकार घडवले आजच्या अनेक राजकारण्याच्या प्रवासासोबत नामदेव शेलार यांची पत्रकारिता अग्रलेख मालिका निर्भिडपणे सुरू आहे.सरकारने सुध्दा त्यांच्या लेखणीची दखल घेवुन प्रशासनाला काम करण्यास भाग पाडले आहे.

  संपुर्ण भारत देशात पत्रकाराची युनियन एक एनजीओ म्हणुन प्रचंड वेगानी काम करत आहे.हजारोच्या संख्येने पत्रकार जोडले गेले आहेत.मोफत आरोग्य सेवा शिक्षण गोरगरीबाना अन्न धान्य वाटप प्रशासनात जनमाणसाची विविध प्रकारची कामे करून पत्रकाराच्या सोयीसुविधा शासकीय योजनाचा लाभ मिळवुन देण्यासाठी केलेल्या प्रयत्नाना यश आले असुन पत्रकाराच्या मांगण्या मान्य होत आहेत.या कार्यक्रमात राज्याचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर माजी मंत्री तथा आमदार गणेशजी नाईक यांनी व्यासपिठावरून मार्गदर्शन केले.यशवंतराव चव्हाण पुरस्कार ज्यांना प्राप्त झाला त्यांचे अभिनंदन करून आपल्याला मिळालेला पुरस्कार हा देशाचे महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या नावाचा आहे त्यांच्या कार्याचे समाजकार्य आपल्या हातुन घडावे अशी अपेक्षा मान्यवरानी केली.

 यावेळी शासनमान्य युवा महाराष्ट्र लाईव्ह टिव्ही (YML NEWS) चॅनेल सा.स्वप्नज्योती टाईम्स वृत्तपत्राचे संपादक मालक गौरव शेलार यांनीही विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर माजीमंत्री गणेश नाईक यांच्याशी संवाद साधला.व्यासपिठावरून आमदार किसनराव कथोरे विकासमंच ट्रस्टच्या अध्यक्षा ज्योती शेलार यांनी गेले 20 वर्षे करत आलेल्या सामाजिक उपक्रमाने तसेच ग्रामीण विकासाला बळ देवुन जनसामाण्याच्या समस्या पत्रकारितेतुन मांडल्याने हा पुरस्काराची निवड झाल्याने आमदार किसनराव कथोरे विकासमंच ट्रस्ट स्वतंत्र संपादक पत्रकार संघाच्या वतीने यशवंतराव चव्हाण मंडळाचे आभार व्यक्त केले.

No comments