web-ads-yml-728x90

Breaking News

आजचा समाज आणि स्त्री

 


 आज आपण बघतो स्त्री तिच्या कर्तृत्वावर कुठच्या कुठे पोचलीय.पण खरंच आजच जग तिला मान सन्मान देते का?. आज हि तिचीच हत्या केली जाते . मग मुलगी जनमाला येणे किंवा मुलीने पुढे जाणे हे वाईट आहे का ? असा प्रश्न पडतो. पण माझ्या दृष्टिकोनातून बघाल तर एक स्त्री समज हि घडवू शकते आणि कुटुंब हि सांभाळू शकते. मला समजत नाही कि जग आणि समाज कधी सुधारणार. आज स्त्रिया पुरुषापेक्षा पुढे आहे ती तिच्या हिमतीने तिच्या मेहनतीने . ती घर हि सांभाळते आणि बाहेरच जग हि सांभाळते. ती नौकरी ही करते आणि मन ही जपते सर्वाना सुखात ठेवते. लहानपानापासून ती भावंडांसाठी आई वडिलांसाठी सगळे काही करत असते . एक पत्नी , एक बहीण , एक आई , एक सून मानून ती सगळे कर्तव्य पार पडते तरी तिला या समजत मान नाही. तिच्या भावनांची कदर केली जात नाही . मर मर मारत असते ती कुटुंबासाठी . तरी तिला दोन शब्द प्रेमाचे मिळत नाही आजही तिला मिळतो तो तिरस्कार. तू अशीच वागते तुला समजत नाही . 

       तुला मर्यादा नाही तू हे करू नको ते करू नकोस लोक काय बोलतील असं वागू नकोस. सगळीकडे नुसता नकार मिळतो. तिला स्वचन्द विहरण्याचा हक्क नाही का? तिला भावना नाही का? तिला नाही वाटत का कि मी उंच उडाण भरावी जगाला आपलंस करावा. सगळ्यांना आपला हेवा वाटेल अस काही तरी करून दाखवावं. सगळे स्वप्न ती बघत असते , आयुष्यभर दुसाऱ्यांसाठी जगात असते. स्वतःच्या इच्छा मारत असते. तिला जगण्याचा हक्क नाही का ? असा प्रश्न पडतो. आपण म्हणतो आपण एकविसावे शतकात जगतोय.मग हे शतक पूर्वीच्या १७ व्य शतकासारखे का त्यात का बदलावं नाही? आहे उत्तर कोणाकडे नाही या प्रश्नच उत्तर समज देऊ शकत नाही. 

       महात्मा फुले नि जर शिक्षणावर जोर दिला नसता तर शाळा मुलींसाठी उघडल्या असता का. जर इंदिरा गांधी हातात सत्ता घेतली नसत तर देश सुधारला असता का, आज स्त्री चूलमूल सांभाळून सगळी जबाबदारी उचलते तरी तिला हा तिरस्कार का. का स्त्रीकडे आजही वाईट नजरेने बघितलं जात. तिलाच सगळं सहन का कराव लागत. या का च उत्तर आहे का या समाजाकडे. तिला आज बाहेर फिरताना भीती वाटते कोणी बबलात्कार केला तर कोणी मला त्रास दिला तर. का ती स्वचन्ड बागडू शकत नाही तिला हवा ते ती का करू शकत नाही. आज तिने छोटे कपडे घातले तर तिच्या चारित्र्यावर हजार प्रश्न उठतात.. आज तिने मॉडर्न राहिल तर जग वाईट नजरेने का बघते? विकार स्त्री मध्ये नाही मनात आहे तो काढून टाका म्हणजे सगळं काही स्वचछ दिसेल आणि स्पष्ट ही. आज तिने मॉडेलिंग केली तरी प्रॉब्लेम, आज तिने व्यवसाय केला तरी प्रॉब्लेम आज तिने नौकरी केली तरी प्रॉब्लेम. करायचं काय तिने. सगळीकडे फक्त नकार. का गर्व नाही तिच्यावर कि ती सगळे काही करू शकते. 

      एवढी हिम्मत आणि शक्ती आहे तिच्यात आज दुर्गेची पूजा का करता मग तुम्ही ती हि स्त्रीच होती ना मग ह्या घरातल्या दुर्गेचा काय? या लक्ष्मीचं काय? आज वंशाला दिवा हवा मानून तिची हत्या केली जाते मग तोच वंश कोण घालत जन्माला? त्यासाठी पण ह्या स्त्रीचिंच गरज पडते ना? नऊ महिने आपल्या उदरात सगळे त्रास सहन करून ती जन्माला घालते. ऐवाढे जर कर्तव्य ती पार पडते तर तिच्या मनाला काय हवय काय करायचं याच लक्ष का दिले जात नाही. म्हटलं तर बर्रेच प्रश्न आहेत पण उत्तर देणारा समाज चांगली उत्तर द्याच सोडन वाईट उत्तरच देतो. 

ह्याला मनोविकार म्हणतात. हा समाज कधी सुधारणार काई माहिती. जाऊ दे किती हि बोलला लिहिला तरी कमीच. समाजाला आपणच सुधारावू शकतो हे जेव्हा कळेल तेव्हाच हा समज सुधारेल आणि स्त्री मनमोकळं विहार करू शकेल. एकच विंनती आहे आपल्या घरात जी दुर्गा लक्ष्मी आहे जी स्वतःच घर सोडून तुमची साथ देते तिला सुखी ठेवा म्हणजे देव नक्की प्रसन्न होईल. असा हा समाज आणि अशी हि स्त्री 

तुम्हाला काय वाटत प्रतिकिया नक्की कळवा.

                                                                  भारती पाटील,ठाणे

 

 

 

No comments