web-ads-yml-728x90

Breaking News

इलेक्ट्रिक वाहनांबाबत शॅले हॉटेल्सचा पुढाकार कौतुकास्पद – पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे

 


BY -   युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

राज्य शासनाने इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर केल्यानंतर मोठ्या हॉटेल्सनी आपल्या ताफ्यात इलेक्ट्रिक वाहने वापरावीत, असे आवाहन केले आहे. यास प्रतिसाद देत शॅले हॉटेल्सने घेतलेल्या पुढाकाराचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी कौतुक केले आहे. इतर आस्थापनांनी देखील इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.शॅले हॉटेल्स मार्फत मुंबई आणि पुण्यात हॉटेल्स चालविली जातात. इलेक्ट्रिक वाहनांबाबत आखलेल्या धोरणांची शॅले चे व्यवस्थापकीय संचालक संजय सेठी यांनी श्री ठाकरे यांना आज सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत माहिती दिली. शॅले २०२५ पर्यंत आपली सर्व वाहने इलेक्ट्रिक वाहने करणार आहे. २०२९ पर्यंत ऊर्जा उत्पादन दुप्पट करणार आहे. तर, २०३१ पर्यंत पूर्णतः नविनीकृत ऊर्जेचा वापर सुरू होईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली. याबरोबरच रियुज, रिड्युस आणि रिसायकल या तत्वानुसार ऊर्जा, पाणी आणि घनकचरा व्यवस्थापनाच्या माध्यमातून पर्यावरण पूरक शाश्वत विकास साधण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.

No comments