web-ads-yml-728x90

Breaking News

मुंबईतील विविध विकास प्रकल्पांच्या कामांचा मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा

 


BY -   युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

मुंबईच्या विकासासाठी सुरू असलेले विविध पायाभूत सुविधा प्रकल्प दर्जेदार आणि कालबद्ध पद्धतीने पूर्ण व्हावेत, या अनुषंगाने पर्यावरण, पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे या प्रकल्पांचा नियमित आढावा घेतात. आज त्यांनी दहिसर चेक नाका परिसरातील वाहतूक कोंडी सोडविणे, वरळी-शिवडी जोडरस्ता तसेच माहिम किल्ला परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास या कामांचा सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत आढावा घेतला.पश्चिम एक्सप्रेस हायवेवर मुंबईतील प्रवेशद्वार असलेल्या दहिसर चेक नाका परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्याकरिता करावयाच्या उपाययोजनांसाठी मंत्री श्री.आदित्य ठाकरे सातत्याने प्रयत्नशील आहेत. आज त्यांनी एमएमआरडीए आणि वाहतूक पोलिसांसमवेत या कामांचा आढावा घेतला. येथे बहुतांश उपाययोजना अंमलात आणल्या गेल्या आहेत. मेट्रो 9 पियर आणि रिसरफेसिंगचे सध्या सुरू असलेले काम पुढील काही दिवसांमध्ये पूर्ण झाल्यानंतर निश्चितच येथील वाहतूक कोंडीचे प्रमाण कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

No comments