web-ads-yml-728x90

Breaking News

मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तालयाला १४ बोलेरो आणि १७ मोटारसायकल गाड्या; नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वाहनांचे लोकार्पण

BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

मीरा-भाईंदर आणि वसई-विरार पोलीस आयुक्तालयाकरिता जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून देण्यात आलेल्या वाहनांचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले. हिरवा झेंडा दाखवून ही वाहने पोलिसांच्या ताफ्यात दाखल करण्यात आली.१ ऑक्टोबर २०२० रोजी स्थापन करण्यात आलेल्या मीरा भाईंदर आणि वसई विरार पोलीस आयुक्तालयाला भेडसावणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी पालकमंत्री शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. आधी पोलीस मुख्यालयाची इमारत आणि आता पोलिसांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्यांना वाहने देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या फंडातून निधी मंजूर करून देण्यात आला. याच निधीतून १४ बोलेरो जीप आणि १७ मोटारसायकल खरेदी करून त्या पोलिसांना आज सुपुर्द करण्यात आल्या.

 

No comments