web-ads-yml-728x90

Breaking News

गणेश मंडळांनी पर्यावरण जागृतीचे कार्य करावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

गणेश मंडळांनी मोठ्या आकाराच्या मूर्तीचा आग्रह न धरता आपल्या कार्याची उंची व व्याप्ती वाढवावी तसेच  मंडळांच्या माध्यमातून पर्यावरण जागृतीचे कार्य करावे असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.राज्यपालांच्या हस्ते राज्यस्तरीय पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव स्पर्धा व सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेतील निवडक विजेत्यांचा राजभवन येथे सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन लोकशाही न्यूज चॅनेल तर्फे करण्यात आले होते.यावेळी लोकशाही न्यूज चॅनेलचे कार्यकारी संपादक नरेंद्र कोठेकर, संचालक गणेश नायडू व शिरीष गदिया प्रामुख्याने उपस्थित होते.राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले, लोकमान्य टिळकांनी सुरु केलेला गणेशोत्सव आता महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला नसून देशाच्या कानाकोपऱ्यात तसेच विदेशातही साजरा केला जातो. गणेशोत्सव मंडळांच्या माध्यमातून पर्यावरण जागृतीचे कार्य सर्वदूर  झाले पाहिजे. गणेश मंडळांनी पर्यावरण रक्षणासोबतच स्वच्छतेचेही काम केले पाहिजे, असेही राज्यपालांनी सांगितले.

No comments