निवडणुक निर्णय अधिकार्याच्या आढावा बैठकीत नियोजन बध्द उपयोजना
BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड,ठाणे
मुरबाड नगरपंचायतीची निवडणुक 21 डिसेंबरला मतदान होऊन 22 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.सदर निवडणुकीचा आढावा निवडणुका निर्णय अधिकारी अभिजित भांडे पाटील,सहा निवडणुक अधिकारी परितोष कंकाळ, वरिष्ठ पोलिस निरिक्षक प्रसाद पांढरे यांच्या उपस्थितीत पार पडली.
यावेळी निवडणुक नियोजन बध्द शांततेने नियमावलीत पार पडणार असल्याचे अभिजित भांडे पाटील यांनी सांगितले.उमेदवारानी उमेदवारी अर्ज ऑनलाईन भरावेत अधिस्विकृतीधारक पत्रकाराना मतमोजणीसाठी प्रवेश दिला जाईल अर्ज भरताना अपेक्षित माहिती भरावी आचारसहितेचे पालन करावे अशा सुचना केल्या यावेळी अनेक मान्यवर पत्रकार उपस्थित होते मतदान केंन्द्र मतमोजणी टेबल प्रचार सभा त्यांना लागणार्या परवानग्या या सर्वाची उपयोजना निवडणुक निर्णय अधिकारी अभिजित भांडे पाटील यांनी योग्यरिते केली आहे.
No comments