चलो ॲप आणि बेस्ट स्मार्ट कार्डचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई
चलो ॲप आणि बेस्ट स्मार्ट कार्डचा उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा सह्याद्री अतिथी गृह येथे पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाला.यावेळी बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबुरकर, बेस्ट समिती सदस्य सर्वश्री अनिल कोकीळ, सुनिल अहिर, बबन कनावजे, राजेश ठक्कर, अनिल पाटणकर, दत्ता नरवणकर, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार, पी. वेलरासू आणि बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र उपस्थित होते.पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, बेस्ट उपक्रम तांत्रिकदृष्ट्या एक पाऊल पुढे आहे. ‘पुढे चला’ हा मंत्र घेऊन वाटचाल करणाऱ्या बेस्टचे काम अभिमानास्पद आहे. आज पर्यायी इंधनाचा विचार करण्याची आवश्यकता असून त्यादृष्टीने वाटचाल करण्याची आवश्यकता असल्याचे श्री.ठाकरे यांनी सांगितले.
No comments