web-ads-yml-728x90

Breaking News

कोविडच्या नव्या ओमायक्रॉन विषाणू संसर्गावर मात करण्यासाठी लसीकरणाला अधिकाधिक गती द्यावी – उपमुख्यमंत्री अजित पवार

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव लातूर

नवा विषाणू ओमायक्रॉनमुळे कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका लक्षात घेऊन जिल्ह्यातील लसीकरणाला अधिकाधिक गती द्यावी, यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, एन.जी.ओ, साखर कारखाने यांचा सहभाग घ्यावा, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.लातूर जिल्हा वार्षिक नियोजन आणि कोरोना संसर्ग वाढू नये यासाठीचे निर्बंध आढावा बैठक नियोजन भवन येथे आयोजित केली होती. त्यावेळी उपमुख्यमंत्री बोलत  होते. या बैठकीला राज्यमंत्री संजय बनसोडे, जि. प. अध्यक्ष राहुल केंद्रे, आ. धीरज देशमुख, आ. विक्रम काळे, आ. सतीश चव्हाण, आ.अभिमन्यू पवार, आ. बाबासाहेब पाटील, महापौर विक्रांत गोजमागुंडे, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जि. प. मुख्यकार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, जिल्हा नियोजनचे सदस्य यावेळी उपस्थित होते.

No comments