web-ads-yml-728x90

Breaking News

रायगड किल्ल्याला भेट ही माझ्यासाठी एक प्रकारे तीर्थयात्राच – राष्ट्रपती राम नाथ कोविंद

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – अलिबाग

रायगड किल्ल्याला भेट ही माझ्यासाठी एक प्रकारे तीर्थयात्राच असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती श्री. राम नाथ कोविंद यांनी आज येथे केले.राष्ट्रपती राम नाथ कोविंद हे रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी आले होते, त्यावेळी ते बोलत होते.यावेळी महामहिम राष्ट्रपतींच्या सुविद्य पत्नी श्रीमती सविता कोविंद, महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, पालकमंत्री कु.आदिती तटकरे, खासदार छत्रपती संभाजीराजे,  खासदार सुनील तटकरे, जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता पारधी, आमदार सर्वश्री भरत गोगावले, अनिकेत तटकरे, प्रशांत ठाकूर, महेश बालदी,जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, राष्ट्रपती महोदयांची कन्या स्वाती कोविंद,  युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती, युवराज शहाजीराजे छत्रपती, तसेच महसूल व पोलिस विभाग तसेच इतर विविध शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

No comments