web-ads-yml-728x90

Breaking News

सतरंज्या,पाणीवाले,पत्रावल्या धारकाना पुन्हा रोजगार;निवडणुकीचा धुराळा उडाला

 


BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव मुरबाड, ठाणे

गेली अनेकवर्षे ज्या अपेक्षावलाची वाट पाहिली परिणामी सार्या कार्यक्रम पुज घरभरणी लग्नसोहळा वाढदिवस जत्रा शिबीरात सभात सतरंज्या उचलल्या पत्रावली उचलल्या पाणी वाढले त्याच हाताना पुन्हा एकदा पदसेवकाला बाजुला सारवुन पुन्हा सतरंज्या पाणी पत्रावल्या रोजगाराची संधी एक कार्र्यकर्ता म्हणून निर्माण झाल्याने अनेकानी वेदनादर्शन घडल्याची चर्चा आहे.

   मुरबाड नगरपंचायतीची पचंवार्षिक निवडणुक सुरू झाली आहे.त्यासाठी आपल्या उमेदवारीसाठी कोणाकोणाकडे भटकंती सुरू आहे.कुठे क्षितला देवीचा नवस तर कुठे बाबाची गुंफा कुणी थोरामोठया दादाचा अर्शिवाद घेतो तर कुठे आमचे आम्हीच शोधत बसलो आहोत त्यातच रंगतदार निवडणुकीत उमेदवार कोण यांची ओळखपरड धुरळयातुन दिसुन येत नाही.

  कधी कधी निवडणुका लढणारे वेगळे असतात तर सतरंज्या पत्रावली पाणीवाले आपला काम निष्ठेने करत असतात त्यांचा अनुभव घेण्याची वेळ आली आहे.

  मुरबाड नगरपंचायत मध्ये उमेदवारीवरून साहेबा साहेबामध्ये दादा भाऊमध्ये बाबा आप्पामध्ये छुप्पी बंडखोरी होऊ शकते मात्र मुरबाडच्या विकासासाठी ज्याचं योगदान हवं अशाच सेवकाची वर्णी राजकारणी लावणार काय या बद्दल सर्वत्र मतदारात उत्सुकता आहे.ज्यांनी अनेक वर्षाच्या समाजसेवा पदे निवडुण गेलेल्या पदावर काय काम केले कोणी ठेकेदारी केली येथुन निवडुण जावुन बाहेरील शहरात जावुन का राहिले.आपल्याला रात्रदिवस शेजारी असणारा सेवक हवा की श्रीमंत भांडवलदार याचं मतांतर मतदारात चर्चेचा विषय बनला असुन वरिष्ठ नेत्यानी पैशावाल्यानाच आमच्यावर लादून पक्षाचे हित साधुनये तुमचे समर्थक आमच्यावर लादण्यापेक्षा आम्हीही तुमचे समर्थक बनवण्यासाठी प्रयत्न करा अशी मतदारात उत्सुकता आहे.

No comments