मुरबाड नगरपंचायत निवडणूक थंडावली
BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड
पहिल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीत असलेला निवडणुक उत्साह येत्या निवडणुकीत दिसून येत नाही गेल्या पाच वर्षात मुरबाड नगरपंचायत मधील अनधिकृत बांधकामे घोटाळा विकास कामात प्रचंड भ्रष्टाचार आणि सेवकांची बोलकी बंद अशा तीघाडी कार्यक्रमात सध्याची मुरबाड नगरपंचायत थंडावली आहे.
सत्तेचा दाव करणारे कोव्हीडच्या कालावधीत जनमाणसांसमोर आले होते का ? सध्याच्या स्थितीत निवडणुका पैसा आणि पैजेच्या नकोत मात्र शहराच्या विकासासाठी स्थानिक उमेदवारांना राजकीय नेत्यांनी बिनविरोध निवडून दिल्यास पुढच्या विकासाच्या दृष्टीने सोयीचे होईल असे जाणकारांचे मत आहे.
मुरबाड नगरपंचायत निवडणुकीत चांगल्या नेतृत्वाना निवडणुका लढवाव्यात यात रस नाही.शिवाय शहराचा विकास कामात कमवण्यासाठी काय आहे याचाही काहींनी विचार केला असावा त्यामुळे राजकीय घडामोडी पाहिजे तेवढ्या दिसून येत नाहीत.
नव्या उमेदीच्या उमेदवारात उत्साह आहे ज्यांना भ्रष्टाचाराची फळे चाखायाची सवय लागली आहे त्यांनाही रस आहेच मात्र शहराच्या विकासासाठी राजकारण विरहित निवडणुका स्थानिक पातळीवर पार पडल्यास त्याचा फायदा स्थानिकांना होणार आहे .
मुरबाड नगरपंचायत मध्ये पक्ष-पार्टी व्यक्ती असा जल्लोष दिसून येत नाही.स्थानिक नेतृत्वाने ठरवल्यास मुरबाड शहराच्या विकासाच्या दृष्टीने नव्या चेहऱ्यांना संधी दिल्यास नेत्यांच्या डोक्याला त्रास होणार नाही आणि अनुभव शिकता शिकता कालावधी सुद्धा निघून जाईल असे सुत्र जोपासल्याचे जावू शकते अशी चर्चा आहे.
No comments