web-ads-yml-728x90

Breaking News

कलेचा वारसा जोपासण्यासाठी कलाप्रेमींनी पुढाकार घ्यावा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आवाहन

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

देशात अनेक प्रकारच्या कला अस्तित्वात असून हा प्राचीन कलेचा मोठा वारसा या भूमीला लाभलेला आहे. हा वारसा आणि कला संस्कृती जोपासण्यासाठी कलाप्रेमींनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.मुंबईच्या फोर्ट येथील जहांगीर कला दालनात ललित कला अकादमीतर्फे आयोजित द्वितीय ‘आंतरराष्ट्रीय प्रिंट द्विवार्षिकी भारत’ या प्रदर्शनातील विजेत्यांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. त्यावेळी राज्यपाल श्री. कोश्यारी बोलत होते. मानवी भाव-भावना कलेच्या माध्यमातून व्यक्त करणे ही दैवीशक्तीच आहे. कलाकारांची भावना समजून घेण्यासाठी कलेची आवड असणेही तितकेच गरजेचे आहे. देशाला अनेक युगांपासून कला-संस्कृती लाभलेली आहे. आजच्या घडीला ही कला, संस्कृती जोपासण्यासाठी अनेक कलाकार पुढे येत आहेत. संगीत ज्या प्रमाणे समजून घेता येते, त्याप्रमाणे कलेला समजून घेणे कठीण आहे. त्यासाठी कलेची आवड निर्माण होणे तितकेच आवश्यक आहे. देशात विविध कला आहेत. ही कला-संस्कृती पुढे चालत राहावी यासाठी कलाकारांनी नवनवीन कलांच्या माध्यमातून नवा समाज घडविण्याची गरजही राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी यावेळी व्यक्त केली.

No comments