web-ads-yml-728x90

Breaking News

महाराष्ट्राच्या नगरपंचायतमध्ये मुरबाडचा प्रभाग 15 उत्कृष्ट पॅर्टन ठरल्याने पुन्हा माजी नगराध्यक्षाच्या पत्नीला उमदेवारी

 


BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव  मुरबाड,ठाणे

मुरबाड शहराचा विकास व्हावा म्हणून नगरपंचायतकडे पाहिले जात असताना येथील आमदार किसनराव कथोरे राहात असलेल्या प्रभाग 15 मागील कालावधीत तात्कालीन माजी नगराध्यक्ष मोहन सासे यांनी केलेल्या विकास कामे स्वच्छता अभियानाने नगरपंचायतीला राष्ट्रपती भवनात सन्मान झाला याचेच बक्षिस म्हणुन की काय मधुरा मोहन सासे यांना प्रभाग 15 मधुन भाजपाचे आमदार खासदार यांनी उमदेवारी दिली अशी चर्चा शहरात रंगू लागली आहे.

   अनेक मागील नगरसेवकाना उमेदवारीत बाजुला ठेवुन काही ठराविक प्रभागात माजी नगरसेवकाच्या घरात उमदेवारी दिली आहे.त्यांच्याकडुन पुन्हा उर्वरित अपेक्षित विकास करून घेण्यासाठी भाजपाच्या आमदार खासदार लोकप्रतिनिधीचा प्रयत्न दिसुन येत आहे.

   प्रभाग 15 मधुन मधुरा मोहन सासे भाजपामधुन निवडणुक लढवित आहेत एकूण 1350 मतदारापैकी 1100 मतदारापर्यंत त्यांचा थेट संपर्क झाल्याने मतदारानीही त्यांचा स्वागत करून भेटी गाठीत भाग घेतला.स्थानिक आमदार किसनराव कथोरे यांनीही प्रभागातील मतदार मान्यवराना भेटी दिल्याने प्रभाग 15 च्या विकास पॅर्टनची चर्चा गांवभर सुरू आहे.

रस्ते,गटारी,भुयारी केबल,सिसिटिव्ही कॅमेरे,पाणी,दर्शनीफलक,चौक फलक,स्ट्रीट लाईट,बागेश्वरीबाग बसण्याचे बाक,पर्यटनस्थळ,बागेश्वरीतलाव,शौचालय अशी सर्वच विकासाची कामे मार्गी लावल्याने प्रभाग 15 पॅर्टन म्हणुन नावजला जात असून स्वच्छेतेने मानकंन मिळवुन दिला आहे.त्यापलीकडे उर्वरित विकासाचा भार भाजपा नेत्यानी मधुरा मोहन सासे यांच्या कडुन अपेक्षित असल्याने त्यांना उमदेवारी दिल्याची चर्चा येथील मतदारात आहे.एक आदर्शवार्ड म्हणुन मतदार आमचा आदर करतात त्यांच्या इच्छा खातीर त्यांना अपेक्षित समाजसेवा नेहमीच करत असतो म्हणुनच आम्ही 1100 मतदारांपर्यंन्त तात्काळ पोहचलो अशा प्रतिक्रिया कार्यकर्त्यानी व्यक्त केल्या.

 

No comments