web-ads-yml-728x90

Breaking News

जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर होणार नवभारत गव्हर्नर अवॉर्डने सन्मानित

 


BY -   युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

रायगड जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांना "नवभारत गव्हर्नन्स अवॉर्ड-2021" ने उद्या सायंकाळी राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. कल्याणकर यांना त्यांनी प्रशासकीय सेवेत लोकाभिमुख व पारदर्शक पद्धतीने नवनवीन उपक्रम राबवून उत्तम सेवा बजावल्याने सन्मानित करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी डॉ.कल्याणकर यांनी आपल्या आतापर्यंतच्या संपूर्ण प्रशासकीय सेवेत मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव, मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगरपालिका आयुक्त, सहसचिव, कामगार आयुक्त आणि जिल्हाधिकारी अशा विविध पदांवर अत्यंत उल्लेखनीय प्रशासकीय कामगिरी केली आहे आणि आता रायगड जिल्ह्यासाठीही ते विविध उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. राजभवन येथे राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते होणारा जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांचा सन्मान ही बाब संपूर्ण रायगडवासियांसाठी अतिशय आनंदाची बाब आहे.

No comments