web-ads-yml-728x90

Breaking News

विद्यार्थी भारती सारख्या संघटनेची देशाला गरज आहे - हेमांगी कवी

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

विद्यार्थी भारती सारखी संघटना आजही तरूणांना घेऊन काम करते ही बाब सुखदायक असून कार्यक्रमात उपस्थित तरुणांच्या मोठ्या संख्येने हेमांगी कवी यांनी आनंद व्यक्त केले. तसेच मुकेश माचकर यांनी देखील विद्यार्थी भारतीच्या या कार्यक्रमाचे भरभरून कौतुक केले. कार्यक्रमाची सुरुवात चळवळीच्या गाण्यापासून व लखीमपूर मध्ये चिरडून हत्या झालेल्या शेतकऱ्यांच्या अस्थी कलश ला आदरांजली देऊन झाली...तसेच कार्यक्रमाचे उद्घाटन एका लहान मुलीचे बालविवाह थांबवून समाजाच्या परंपरेने जखडलेल्या बांधनांना तोडून त्या मुलीच्या हातात पुस्तक देऊन कार्यक्रमाच्या उद्घाटक मंजिरी धुरी यांनी केले. लेखिका व नाट्य दिग्दर्शक वंदना खरे, हेमांगी कवी अल्का गाडगिळ , मुकेश माचकर, मेहुल मेपाणी, हरीश सदानी , भरत इराणी यांची प्रमुख उपस्थिती असून त्यांची भाषणे देखील झाली असल्याची माहिती राष्ट्रीय उपाध्यक्ष अर्जुन बनसोडे यांनी दिली. तसेच कार्यक्रमात अनेक मान्यवरांना पुरस्कृत करण्यात आले. वंदना खरे यांना कविता महाजन पुरस्कार प्रज्ञा पवार यांना कविता महाजन पुरस्कार ज्योती ताई बडेकर यांना सावित्री पुरस्कार विद्या ताई चव्हाण यांना सावित्री पुरस्कार विजेता ताई भोनकर यांना रमाई पुरस्कार स्मिता ताई साळुंखे यांना रमाई पुरस्कार पूजा ताई बडेकर यांना कार्यरत पुरस्कार गुडडी यांना कार्यरत पुरस्कार पुरस्कार सलोनी तोडकरी यांना विद्यार्थी रत्न पुरस्कार पूजा मुधाने यांना विद्यार्थी रत्न पुरस्कार अस्मा शेख यांना विद्यार्थी रत्न पुरस्कार हरीश सदानी यांना शंकूतला परांजपे पुरस्कार संतोष शिंदे यांना कार्यरत पुरस्कार हेमांगी कवी यांना स्मिता पाटील पुरस्कार हेरंब कुलकर्णी यांना कार्यरत पुरस्कार दीपाली ताई बडेकर यांना स्मिता पाटील पुरस्कार हेरंब कुलकर्णी यांना कार्यकत पुरस्कार वर्षा विद्या विलास यांना कार्यरत पुरस्कार सर्व पुरस्कर्त्यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेत यांना या पुरस्काराने सन्मानित केले गेले. अशी माहिती विद्यार्थी भारती राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्रेया निकाळजे यांनी दिली. विल्सन कॉलेज ,SST कॉलेज उल्हासनगर तसेच कल्याण, डोंबिवली ,विरार,वसई, माणगाव, सातारा, व मुंबईतील अनेक ठिकाणाहून विद्यार्थ्यांनी बालविवाह विषयाला घेऊन पथनाट्य, डान्स, एकपात्री अभिनय, नाटक , विविध कवितांचे सादरीकरण केले . अशी माहिती स्पर्धा प्रमुख साक्षी भोईर यांनी दिली. कार्यक्रमाच्या शेवटी बालविवाह विरोधी एक ठराव मांडला गेला जो महाराष्ट्र सरकारच्या वतीने राबविला जावा यासाठी विद्यार्थी भारती लवकरच सरकारची भेट घेईल.अशी माहिती महाराष्ट्र अध्यक्ष पूजा मुधाने यांनी दिली. कार्यक्रम हा पूर्णपणे लोकनिधीतून उभा राहिला असून मुंबई पोलीस तसेच मुबाईकरांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभार मानत हा कार्यक्रम जरी संपला असला तरीही बालविवाहाला घेऊन वस्तीवस्तीस खेड्यापाड्यात वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृतीचे काम चालूच असणार आहेत असे कार्यक्रम प्रमुख शुभम राऊत यांनी दिली.

No comments