web-ads-yml-728x90

Breaking News

राज्य निवडणुक आयोगाचे प्रभाग रचना आरक्षण सोडत जाहिर

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

राज्य निवडणुक आयोगाने क्र 1 नुसार 86 मुदत संपलेल्या नगरपंचायतीचा आरक्षण सोडत कार्यक्रम आणि संदर्भ क्र.2 नुसार 27 नगरपंचायतीचा प्रभाग रचना आरक्षण सोडत कार्यक्रम दि.09/12/2021 रोजी जाहिर केला आहे.

कार्यक्रमानुसार दिनांक 12/11/2021 रोजी सर्व 113 नगरपंचायतीचा आरक्षण सोडत कार्यक्रम घेण्यात आला.यासंदर्भात प्राप्त अहवालावरून असे दिसून आले की महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती नगरपालिका औद्योगिक नगरी अधिनियम 1965 मधील कलम 9 मधील स्पष्टीकरण नुसार अशा प्रमाणामधील अपुर्णाक जर एक व्दितीयांशपेक्षा कमी असेल तर तो दुर्लक्षित केला पाहिजे आणि जर तो एक व्दितीयांश किंवा त्यातुन अधिक असेल तर त्या अपुर्णाकाची एक म्हणुन गणना केली पाहिजे.या तरतुदीचा अवलंब करून ना.मा.प्र.साठी 27 टक्के या 4.59 जागा ऐवजी 5 जागा गणण्यात आलेल्या आहेत आणि त्यानुसार सोडत काढण्यात आलेली असल्याचे समजत आहे.

No comments