web-ads-yml-728x90

Breaking News

पालघर जिल्ह्यासह पेसा अंतर्गत शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम हाती घेणार – शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

पालघर जिल्ह्यासह राज्यातील पेसा अंतर्गत शिक्षकांच्या सर्व रिक्त जागा भरण्यास शासन सकारात्मक आहे. या जागा भरण्यासाठी शालेय शिक्षण विभागामार्फत कालबद्ध कार्यक्रम हाती घेतला जाईलअसे शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी सांगितले. या जागा भरण्यासाठी आयुक्तांनी तातडीने प्रस्ताव सादर करावा आणि शिक्षण विभागाने सामान्य प्रशासन आणि वित्त विभागाची परवानगी घ्यावीअसे निर्देशही प्रा.गायकवाड यांनी दिले.पालघर जिल्ह्यातील शिक्षकांची पदे भरताना पवित्र पोर्टल प्रणाली लागू न करता स्थानिक पातळीवरप्रक्रिया राबवावी या मागणीसाठी तेथील आदिवासी डीटीएडबीएड (टीईटी/ सीटीईटी) कृती समितीने आंदोलन केले आहे. त्याची दखल घेऊन प्रा.गायकवाड यांनी याबाबत ऑनलाईन बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी पालघर जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधीशालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णासामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिकग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार मीनाशिक्षण आयुक्त विशाल सोळंखीपालघर जिल्हाधिकारीशिक्षणाधिकारी यांच्यासह आंदोलनकर्ते आदिवासी डीटीएडबीएड (टीईटी/ सीटीईटी) कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

No comments