web-ads-yml-728x90

Breaking News

‘मिशन वात्सल्य’ मिशन मोडवर राबवा – महिला व बाल विकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

कोविडमुळे अनाथ झालेल्या बालकांना व कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे निधन होऊन विधवा झालेल्या महिलांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ या संकल्पनेवर आधारित ‘मिशन वात्सल्य’ हे मिशन आम्ही हाती घेतले आहे.‘मिशन वात्सल्य’ ही योजना राज्यात मिशन मोडवर राबविण्याचे  निर्देश महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी  दिले.मिशन वात्सल्यबाबत आढावा बैठक महिला व बाल विकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली. या आढावा बैठकीस महिला व बाल विकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन, आयुक्त, महिला व बालविकास राहूल मोरे,  एकात्मिक बाल विकास आयुक्त रुबल अग्रवाल, सर्व विभागीय महसूल आयुक्त उपस्थित होते.

No comments