web-ads-yml-728x90

Breaking News

मेट्रो मार्गिका-३ प्रकल्प तातडीने मार्गी लावण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

‘माण-हिंजवडी ते शिवाजीनगर’ मेट्रो मार्गिका-३ प्रकल्प तातडीने मार्गी लावण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे आणि सामान्य नागरिकांना वाहतूक कोंडिचा त्रास होणार  नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले.विभागीय आयुक्त कार्यालयात माण-हिंजवडी ते शिवाजीनगरच्या मेट्रो मार्गिका-3 च्या कामासाठी कराव्या लागणाऱ्या वाहतूक नियोजनाचा उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी आढावा घेतला. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, जि.प.अध्यक्षा निर्मला पानसरे, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार दिलीप मोहीते, आमदार ॲड. अशोक पवार, आमदार सुनिल टिंगरे, आमदार सिध्दार्थ शिरोळे, तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख आदी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, सार्वजनिक-खासगी सहभाग असलेल्या या मेट्रो मार्गिकेचे काम गतीने पूर्ण करण्याचे नियोजन आहे. हा प्रकल्प यशस्वीपणे मार्गी लावण्यासाठी तसेच या संबंधीच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रकल्पाच्या संबंधित सर्व यंत्रणांचा प्रत्येक आठवड्याला आपण आढावा घेणार असून पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी हा प्रकल्प महत्वपूर्ण ठरणार आहे.

No comments