web-ads-yml-728x90

Breaking News

समाजसेवक सुनिल सकट यांना लोकशाहिर अण्णाभाऊ साठे समाजरत्न पुरस्कार प्रदान

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव अहमदनगर

अहमदनगरचे भुमिपुत्र समाजसेवक सुनिल भिमराव सकट यांना बिड,माजलगांव येथे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे मानव विकास संस्थेच्या वतीने अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी विशेषांक प्रकाशन व २०२१ च्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये माजलगांव चे भाग्य विधाते लोकप्रिय आमदार प्रकाशदादा सोलंके, जागतीक जेष्ठ विचारवंत डॉ.श्रीपाल सबनिस, मा.आमदार डि.के. देशमुख,मानवी हक्क अभियान चे मिलींद आव्हाड,संस्थेचे संस्थापक सुमंतजी गायकवाड सर,ह्या मान्यवरांच्या शुभहस्ते राज्यस्तरीय "लोकशाहिर अण्णाभाऊ साठे समाजरत्न पुरस्कार" बहाल करुन गौरविन्यात आले त्या प्रसंगी राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाचे अ.नगर जिल्हा सरचिटनीस  प्रदिपजी ससाणे यांचाही अण्णाभाऊ साठे विशेषांक सप्रेम भेट देऊन सत्कार करण्यात आला.सुनिल सकट गेले पंधरा वर्षापासुन समाजसेवेचे कार्य करत आहेत.त्यांना या अगोदर राज्यामधुन विवीध संस्थेचे तिस पुरस्कार मिळाले असुन.सकट यांनी नेहमिच मानवसेवा हि ईश्वरसेवा समजुन मोफत शालेय साहित्य वाटप करणे, स्वच्छता मोहिम राबवने,वृक्ष रोपन करणे, अन्नधान्य वाटप करणे, वृक्षरोपे वाटप करणे, रक्तदान करणे, सॅनेटायजर व मास्क वाटप करणे,सुनिल सकट नेहमीच महापुरुषांच्या जयंत्या सामाजीक उपक्रम राबवुन साज-या करत असतात. ते नागरीकांसाठी जिवणावश्यक साहित्यासाठी शासना कडे पाठपुरावा करत आहेत.ह्याच सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना महान साहित्यीक राष्ट्रपुरुषांच्या नावाचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे.त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

No comments