विजू पेणकरांचे ‘खेळचरित्र’ हे संघर्षातून निर्माण झालेल्या व्यक्तीमत्त्वाचा गौरव – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई
राष्ट्रीय विजेते कबड्डीपटू आणि ‘भारत श्री’ हा किताब मिळविणारे राज्याचे पहिले विजेते शरीरसौष्ठवपटू विजू पेणकर यांचे ‘योद्धा’ खेळचरित्र हे संघर्षातून निर्माण झालेल्या व्यक्तीमत्त्वाचा गौरव असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केले.‘भारत श्री’ विजू पेणकर यांच्या ‘योद्धा’ या खेळचरित्राचे प्रकाशन सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. हा प्रकाशन सोहळा माझगाव येथील सर एली कदुरी शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार रविंद्र वायकर, आमदार शशिकांत शिंदे, ज्यूईश फेडरेशनचे जॅानथन सॅालोमन, व्यायाममहर्षी मधुकर तळवलकर, डेवीड तळेगावकर, प्रकाशक प्रज्ञा जांभेकर-चव्हाण आदी उपस्थित होते. ज्येष्ठ क्रीडा पत्रकार संदीप चव्हाण लिखित हे पुस्तक सदामंगल पब्लिकेशनने प्रकाशित केले आहे.
No comments