जुन्नर तालुक्यासाठी स्वतंत्र लघु पाटबंधारे उपविभागाबाबत प्रस्ताव सादर करावा – मृद व जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई
जुन्नर हा पुणे जिल्ह्यातील भौगोलिकदृष्ट्या मोठा असलेला तालुका आहे त्यामुळे या तालुक्यासाठी स्वतंत्र लघु पाटबंधारे उपविभागासाठी असलेल्या मागणीबाबत विभागाने प्रस्ताव सादर करून कार्यवाही करण्याचे निर्देश मृद व जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.पुणे जिल्ह्यातील जलसंधारण कामाचा आढावा राज्यमंत्री श्री.भरणे यांनी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपसचिव दिलीप प्रक्षाळे, पुणेच्या जिल्हा जलसंधारण अधिकारी सुजाता हांडे, जलसंधारण उपअभियंता गौरव बोरकर यावेळी उपस्थित होते.राज्यमंत्री श्री.भरणे म्हणाले, पुणे जिल्ह्यातील जुन्नर हा तालुका भौगोलिकदृष्ट्या मोठा आहे त्यामुळे या भागासाठी जिल्हा परिषद पुणेअतंर्गत नवीन लघु पाटबंधारे उपविभागाची आवश्यकता आहे. त्यामुळे याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठवून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना राज्यमंत्री श्री.भरणे यांनी बैठकीत केल्या.
No comments