कृष्णानगर येथे बिबट्याचा वावर,नितीन लांडगे यांचे वन विभागाला निवेदन
BY - युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे
बुधवारी मानपाडा, कृष्णानगर या लोकवस्ती मध्ये जे की संजय गांधी राष्ट्रीय उद्याना लगत आहे तेथे बिबट्याचा वावर होताना स्थानिक राहिवाश्यानी पाहिले.युवा सेना युवाधिकारी नितीन लांडगे यांनी याची त्वरीत दखल घेऊन पुढील धोका लक्षात घेता गुरुवारी वन्य क्षेत्रपाल अशोक सर यांना या ठिकाणी योग्य ती काळजी घ्यावी असे निवेदन देण्यात आले तसेच वन विभागाने याची दखल घेत आपली टीम त्या ठिकाणी पाठवून रहिवाशांना योग्य ती काळजी कशी घ्यावी याचे मार्गदर्शन केले.
No comments